चिपरीमध्ये रक्ताचा सडा! पाठलाग करून 22 वर्षीय तरुणाची हत्या, पण हत्येमागचं नेमकं कारण काय?

Last Updated:

शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात संदेश लक्ष्मण शेळके (वय-22) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. बुधवारी सकाळी तो बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घरी परत येत असताना...

Crime News
Crime News
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. संदेश लक्ष्मण शेळके (वय-22) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
बहिणीला सोडून येत असताना हल्ला
जयसिंगपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश बुधवारी सकाळी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाट्यावर आपल्या बहिणीला सोडवण्यासाठी मोटारसायकलवरून गेला होता. बहिणीला सोडून घरी परत येत असताना, घोडावत ऑईल मिलजवळील मार्गावर दबा धरून बसलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला.
यावेळी हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने संदेशवर सपासप वार केले. मानेवर आणि पाठीवर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर तात्काळ पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंकी आणि पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनीही पाहणी केली.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांना ताब्यात घेतले
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये काही संशयित दिसून आले. या दोघांनी रेनकोट घातले होते आणि चेहरा झाकलेला होता. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती.
मारेकऱ्यांनी मोटारसायकलने पाठलाग करून संदेशचा खून केला, त्यामुळे या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गुन्हे शोध पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते, मात्र पोलिसांना लवकरात लवकर गुन्ह्यामागील सत्य समोर येण्याची आशा आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
चिपरीमध्ये रक्ताचा सडा! पाठलाग करून 22 वर्षीय तरुणाची हत्या, पण हत्येमागचं नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement