"आंबा देतो", म्हणत 55 वर्षीय नराधमाचे 16 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत एका 55 वर्षीय नराधमाने 16 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे...
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 16 महिन्यांच्या एका चिमुकलीवर एका 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा हा संतापजनक प्रकार आहे. ही घटना मंगळवारी, सकाळी 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान घडली.
आमिष दाखवून केले घृणास्पद कृत्य
चिमुकलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 'आंबा खायला देतो' असे आमिष दाखवून त्या लहान मुलीला आपल्या घरी नेले. काही वेळातच मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा तिला हा प्रकार लक्षात आला आणि ती हादरून गेली. आईने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली आहे.
advertisement
समाजातून तीव्र संताप
ही घटना केवळ एका निष्पाप मुलीवरचा अत्याचार नसून, संपूर्ण समाजाच्या अंत:करणावर झालेला आघात आहे. या घृणास्पद कृत्यामुळे सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माणुसकीची राखरांगोळी करणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत वाद; पतीने भररस्त्यात होर्डिंगला गळफास घेऊन संपवलं जीवन
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 12:31 PM IST