10 वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार! जीवे मारण्याची धमकी देऊन लॉजवर नेले, साताऱ्यात खळबळ
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
साताऱ्यात एका 25 वर्षीय तरुणाने 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी 2023 पासून तिच्यावर...
सातारा : साताऱ्यात एका 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तिला कारमधून एका लॉजवर नेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने हे कृत्य केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
गेल्या दोन वर्षांपासून करत होता पाठलाग
पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिला खटाव तालुक्यातील एका गावात 2023 मध्ये, ती आठवी इयत्तेत शिकत असल्यापासून सतत त्रास देत होता. "तू माझ्याशी बोल, नाहीतर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकीन," अशी धमकी तो सतत देत होता. 2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी आरोपीने तिला फोन करून सातारा शहरातील एका चौकात बोलावले. त्यावेळी त्याच्या चारचाकी गाडीमध्ये त्याचे दोन मित्रही होते. आरोपीने तिला गाडीत बसण्यास सांगितले आणि ती बसली.
advertisement
कारमधून लॉजवर नेत अत्याचार
गाडी पोवई नाका परिसरात नेण्यात आली. तेथे एका लॉजजवळ गाडी थांबवून, पार्किंगमध्ये आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर तिला लॉजमध्ये नेऊन तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घाबरून न जाता थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
advertisement
आरोपीच्या मित्रांवरही गुन्हा
पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असूनही आरोपीसोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनीही त्याला साथ दिली. ते तिघेही गाडीतून लॉजपर्यंत सोबत गेले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही मित्रांवरही पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : पोरीच्या नादात मध्यरात्री रक्तरंजित राडा, चौघांनी गाठून मृणालचा घेतला जीव, थरकाप उडवणारी घटना
advertisement
हे ही वाचा : धक्कादायक! वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत वाद; पतीने भररस्त्यात होर्डिंगला गळफास घेऊन संपवलं जीवन
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
10 वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार! जीवे मारण्याची धमकी देऊन लॉजवर नेले, साताऱ्यात खळबळ


