पोरीच्या नादात मध्यरात्री रक्तरंजित राडा, चौघांनी गाठून मृणालचा घेतला जीव, थरकाप उडवणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Chandrapur: चंद्रपूर शहरातील अष्टभूजा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरातील अष्टभूजा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चार जणांनी मध्यरात्री गाठून तरुणाला लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम (२६) टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे (३०) सुलतान अली साबीर अली (३०), बबलू मुनीर सय्यद (३८) असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी चंद्रपूर शहरातील अष्टभूजा वॉर्ड परिसरातील रहिवासी आहेत. तर छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ (३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. चार आरोपींनी लाठीकाठीने मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. या हत्येमागे प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृणाल हेडाऊ हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. तो एकटाच राहत असल्याने परिसरातील एका तरुणाच्या मैत्रिणीशी तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब आरोपी सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम याला आणि त्याच्या मित्रांना समजली. त्यानंतर त्यांनी मृणालला जाब विचारण्यासाठी अष्टभूजा परिसरात गाठले.
'तू माझ्या मैत्रिणीशी जवळीक का साधतोस?' असा प्रश्न विचारत चौघांनी मृणालला लाठीकाठीने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात गंभीर जखमी झालेल्या मृणालचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्रामसह त्याच्या इतर तीन मित्रांना देखील अटक केली. हे चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली लाठीकाठी आणि कपडे जप्त केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 06, 2025 7:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरीच्या नादात मध्यरात्री रक्तरंजित राडा, चौघांनी गाठून मृणालचा घेतला जीव, थरकाप उडवणारी घटना


