Realme P4 Power की Redmi Note 15 Pro, कोणता फोन बेस्ट? पाहा डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Realme P4 Power Vs Redmi Note 15 Pro: Realme P4 Power आणि Redmi Note 15 Pro हा भारतात 29 जानेवारीला लॉन्च करण्यात आला आहे. दोन्हीही फोन जवळपास 30 जार रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. चला दोन्ही स्मार्टफोन्सची तुलना करुया, ज्यामध्ये याचा परफॉर्मेंस, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि किंमतींविषयी जाणून घेऊया.
Realme P4 Power Vs Redmi Note 15 Pro: भारतात गुरुवारी एकाच दिवशी दोन दमदार मिड-रेंज स्मार्टफोन्स Realme P4 Power आणि Redmi Note 15 Pro लॉन्च झाले आहेत. दोन्हीही फोन एकसारक्या प्रोसेसरसह येतात. मात्र बॅटरी, कॅमेरा आणि किंमतींच्या बाबतीत यामध्ये मोठा फरक दिसतो. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, तुमच्यासाठी कोणता फोन बेस्ट डील ठरु शकतो.
परफॉर्मेंसच्या बाबतीत, दोन्ही स्मार्टफोन MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. 4nm टेक्नॉलॉजीवर बनवलेले, ते गेमिंग, मल्टीटास्किंग आणि दैनंदिन वापरासाठी मजबूत कामगिरी देते. खरंतर, Realme P4 Power मध्ये एक समर्पित AI HyperVision+ चिप आहे, जी गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव आणखी स्मूद बनवते.
Realme P4 Power Vs Redmi Note 15 Pro: बॅटरी
advertisement
बॅटरीच्या बाबतीत Realme P4 Power स्पष्टपणे पुढे आहे. यामध्ये 10,001mAh ची मोठी बॅटरी मिळते. जी दीर्घकाळ चालण्याचा दावा करते. फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्टही आहे. तसंच Redmi Note 15 Pro मध्ये 6,580mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
advertisement
Realme P4 Power विरुद्ध Redmi Note 15 Pro: कॅमेरा
कॅमेरा सेक्शनमध्ये Redmi Note 15 Pro ने बाजी मारली. यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो उत्तम डिटेल, झूम आणि स्थिर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देतो. दुसरीकडे, Realme P4 Power मध्ये 50MP चा सोनी सेन्सर आहे, जो चांगली फोटोग्राफी देतो, परंतु कॅमेरा उत्साही लोक Redmi ला पसंती देऊ शकतात.
advertisement
Realme P4 Power Vs Redmi Note 15 Pro: डिस्प्ले
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, Redmi मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 120Hz AMOLED पॅनेल आहे, तर Realme मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 nits ब्राइटनेससह AMOLED डिस्प्ले आहे, जो बाहेरील वापरासाठी आणि गेमिंगसाठी चांगला आहे.
Realme P4 Power Vs Redmi Note 15 Pro: किंमत
advertisement
किंमतीविषयी बोलायचं झाल्यास Realme P4 Power ची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये आहे. तर Redmi Note 15 Pro 29,999 रुपयांपासून सुरु होतो.
Realme P4 Power ची किंमत
8GB RAM + 128GB स्टोरेज: 25,999 रुपये
8GB RAM + 256GB स्टोरेज: 27,999 रुपये
advertisement
12GB RAM + 256GB स्टोरेज: 30,999 रुपये
Redmi Note 15 Pro ची किंमत
8GB RAM+ 128GB स्टोरेज: 29,999 रुपये
8GB RAM+ 256GB स्टोरेज: 31,999 रुपये
कोण आहे बेस्ट?
तुम्हाला दीर्घ बॅटरी लाइफ, गेमिंग आणि थोडी कमी किंमत हवी असेल तर Realme P4 Power बेस्ट ऑप्शन आहे. तर तुमची प्रायोरिटी शानदार कॅमेरा आणि फोटोग्राफी असेल तर Redmi Note 15 Pro तुमच्यासाठी बेस्ट फोन ठरु शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 5:41 PM IST










