advertisement

गाडी घरी असुनही कट झाला टोल? FASTag अलर्ट ऑन केलाय का? NHAIने परत केले 18 लाख रुपये 

Last Updated:

FASTag Payment Error: फास्टॅग सिस्टमध्ये समस्यांविषयी मोठा खुलासा समोर आला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने जवळपास 18 लाख प्रकरणांमध्ये टोलची रक्कम परत केली आहे. सरकारने मान्य केले की, जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये मॅन्युअलटी एंट्रीमुळे चुकीचा टोल कट झाला आहे.

फास्टॅग पेमेंट
फास्टॅग पेमेंट
Wrong FASTag payment: तुम्ही घरी बसले आहात, तुमची गाडी घराच्या बाहेर उभी आहे. पण अचानक मोबाईलवर मेसेज येतो की, टोल कट झाला आहे. तुमची गाडी ना चालली, ना टोल प्लाझावर गेली. तरीही फास्टॅगमधून पैसे कट झाले. आता अशा घटना सरकारी कागदांवर नोंदवल्या गेल्या आहेत. NHAI ने मान्य केले आहे की, 2025 दरम्यान असे जवळपास 18 लाख प्रकरणांमध्ये लोकांकडून चुकीच्या पद्धतीने टोल वसुल करण्यात आला आणि नंतर पैसे परत करावे लागले. इंट्रेस्टिंग म्हणजे यामधून प्रत्येक तिसऱ्या प्रकरणात गाडी टोल प्लाझावर पोहोचत नव्हती. तरीही सिस्टमने पैसे कट केले.
फास्टॅग सिस्टीममधील या त्रुटींबद्दल आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान अंदाजे 18 लाख  प्रकरणांमध्ये टोल पेमेंट परत केले. यापैकी सुमारे 35 टक्के प्रकरणांमध्ये असे आढळून आले की ज्या वाहनांचे फास्टॅग शुल्क कापले गेले होते ते त्यावेळी टोल प्लाझावर उपस्थित नव्हते, तरीही फास्टॅग वॉलेटमधून टोल कापला जात होता.
advertisement
चुकीच्या FAStag डेबिटची कारणे
सरकारी माहितीनुसार, ही त्रुटी बहुतेकदा टोल प्लाझावर मॅन्युअल एंट्रीमुळे होते. तांत्रिक समस्यांमुळे ऑटोमॅटिक सिस्टम बिघडल्यास, टोल कर्मचारी मॅन्युअली वाहनाचा नंबर सिस्टममध्ये एंटर करतात. या चुकीच्या नंबरमुळे दुसऱ्या वाहन मालकाच्या फास्टॅगमधून पैसे कापले जाऊ शकतात.
advertisement
लोकसभेत देण्यात आली माहिती 
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने 2025 मध्ये 17.6 लाख व्यवहार नोंदवले आहेत जिथे टोल चुकीच्या पद्धतीने कापले गेले आणि परत केले गेले. हे एकूण 464 कोटी फास्टॅग व्यवहारांचे प्रतिनिधित्व करते. टक्केवारीच्या बाबतीत हा आकडा फक्त 0.03 टक्के दर्शवित असला तरी, सरकार ते गांभीर्याने घेत आहे.
advertisement
मॅन्युअली एंट्री संपवण्याची तयारी 
सामान्यतः असं दिसतं की, लोकांच्या वाहनांच्या फास्टॅगमधून चुकीच्या पद्धतीने पैसे कट केले गेले. अनेक लोकांनी अशा प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरही प्रश्न उपस्थित केले. आता या प्रकरणाला गांभीर्याने घेत सरकार टोल सिस्टमध्ये वाहन नंबरची मॅन्यु्ल एंट्री पूर्णपणे बंद करण्यावर विचार करत आहे. यामुळे चुकीचे पैसे कट होणे आणि लोकांना येणाऱ्या अडचणी कमी होतील.
advertisement
सरकारने असेही म्हटले आहे की, फास्टॅग लागू झाल्यापासून टोल प्लाझा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ खुप कमी झालाय. पूर्वी टोल प्लाझा ओलांडण्यासाठी वाहनांना सरासरी 12.2 मिनिटे लागायची, परंतु आता हा वेळ सुमारे 40 सेकंदांपर्यंत कमी झाला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते, 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे नेटवर्कमधून एकूण 50,195 कोटी रुपयांचा टोल वसूल झाला, जो मागील संपूर्ण आर्थिक वर्षात 61,508 कोटी रुपयांचा होता.
advertisement
तुम्ही FASTag टोल पेमेंटसाठी अलर्ट सेट-अप केलेला नसेल, तर तत्काळ करा. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पद्धतींचा वापर करु शकता.
बँक पोर्टल किंवा अ‍ॅपमधून
आपल्या बँकेचे FASTag पोर्टल किंवा मोबाईल अ‍ॅप जसं की, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक किंवा My FASTag मध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर सेटिंग, मॅनेज अलर्ट, नोटिफिकेशन किंवा प्रोफाइल सेक्शनमध्ये जा. येथे ट्रांझेक्शन आणि लो बॅलेन्ससंबंधित SMS अलर्ट ऑन करा. यानंतर मिनिमम बॅलेन्सची लिमिट ठरवा. त्याआधी, तुमचा योग्य आणि अॅक्टिव्ह मोबाईल नंबर FASTag शी लिंक केलेला आहे याची खात्री करा, कारण सर्व अलर्ट या नंबरवर येतात.
advertisement
मिस्ड कॉलने बॅलन्स चेक करा 
FASTag यूजर मिस्ड कॉल फीचर देखील वापरू शकतात. ते (+91-8884333331) वर मिस्ड कॉल देऊन त्यांचा FASTag बॅलन्स तपासू शकतात. तुम्हाला अ‍ॅप किंवा पोर्टलमध्ये समस्या येत असेल, तर तुम्ही तुमच्या FASTag जारी करणाऱ्या बँकेच्या टोल-फ्री कस्टमर केअर नंबरवर कॉल करून एसएमएस अलर्ट अ‍ॅक्टिव्ह करू शकता. FASTag जारी केल्यानंतर प्रत्येक टोल व्यवहारासाठी आणि बॅलन्स अपडेटसाठी एसएमएस अलर्ट सामान्यतः ऑटोमॅटिक प्राप्त होतात. एसएमएस येत नसतील, तर तुमचा मोबाइल नंबर अपडेट करा आणि तुमची अलर्ट सेटिंग्ज तपासा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
गाडी घरी असुनही कट झाला टोल? FASTag अलर्ट ऑन केलाय का? NHAIने परत केले 18 लाख रुपये 
Next Article
advertisement
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्लीत कोणाला संधी?
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्ल
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आ

  • अजितदादांनी अकाली घेतलेल्या एक्झिटने राज्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजक

  • अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजकीय जागांवर आता पवार कुटुंबातील

View All
advertisement