Redmi Note 15 Pro आणि प्रो+ लॉन्च! पाहा किंमत किती, कसा करावा बुक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Redmi Note 15 Pro- रेडमी नोट प्रो आणि रेडमी नोट 15 प्लस आज लॉन्च झाले आहेत. या दोन्ही फोन्सची बुकिंग तुम्ही अॅमेझॉन आणि शाओमी वेबसाइटवर करु शकता. प्री-बुकिंगवर चांगले ऑफर्सही मिळत आहेत. दोन्हीही फोन्समध्ये 200एफपी चा कॅमेरा लावलेला आहे.
नवी दिल्ली : शाओमीने भारतात रेडमी 15 प्रो 5जी (Redmi Note 15 Pro 5G) आणि रेडमी नोट 15 प्रो+ 5जी (Redmi Note 15 Pro+ 5G) अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन आता प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. हे अॅमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर बुक केले जाऊ शकतात.
₹29,999 च्या सुरुवातीच्या किमतीसह, ही सीरीज थेट प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटला लक्ष्य करून लाँच करण्यात आली आहे. दोन्ही फोन प्री-बुकिंग ऑफर्ससह उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त ₹1,999 ची टोकन रक्कम देऊन Amazon वर तुमचा फोन बुक करू शकता. ICICI आणि HDFC कार्ड वापरून EMI ट्रांझेक्शनवर ₹3,000 ची फ्लॅट सूट आणि पूर्ण पेमेंटवर ₹2,000 ची सूट आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ₹4,999 पर्यंतचे Amazon फायदे देखील मिळतात, ज्यामध्ये एका वर्षासाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि मोफत Redmi Watch Move यांचा समावेश आहे.
advertisement
या सीरीजचा सर्वात प्रीमियम मॉडल रेडमी नोट 15 प्रो+ 5जी (Redmi Note 15 Pro+ 5G) लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 (Snapdragon 7s Gen 4) चिपसेटसह येतो. यामध्ये 12GB पर्यंतची रॅम आणि 512GB पर्यंतचा इंटरनल स्टोरे देण्यात आला आहे. जो याला मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी एक बेस्ट ऑप्शन बनवतो. रेडमी नोट 15 प्रो+ 5जी (Redmi Note 15 Pro+ 5G) मध्ये 6.83-इंचांचा क्रिस्टल-रेस एमोलेड(CrystalRes AMOLED) डिस्प्ले आहे. जो 1.5K रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 3200 निट्सची जबरदस्त ब्राइटनेसमुळे हे तीव्र उन्हातही सहज वापरले जाऊ शकते.
advertisement
फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सेल 'सुपर' कॅमेरा
फोटोग्राफी उत्साही लोकांसाठी, Redmi Note 15 Pro+ 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि आकर्षक सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. कॅमेरा सेटअप अंधारातही स्पष्ट आणि डिटेल्स प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी डिझाइन केला आहे.
advertisement
6500mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग
Redmi Note 15 Pro+ 5जी ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची बॅटरी लाईफ. Redmi Note 15 Pro+ 5जी मध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी आहे. फोन बॉक्समध्ये 100W फास्ट चार्जरसह येतो, जो फोनला काही वेळात चार्ज करतो. शिवाय, फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी उच्च-स्तरीय IP66 ते IP69K रेटिंग आहेत.
advertisement
रेडमी नोट 15 प्रो+ 5जीची किंमत
8GB + 256GB: ₹37,999
12GB + 256GB: ₹39,999
12GB + 512GB: ₹43,999
रेडमी नोट 15 प्रो 5जी (Redmi Note 15 Pro 5G)
तुम्हाला थोड्या कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स हवे असतील तर रेडमी नोट 15 प्रो 5 जी (Redmi Note 15 Pro 5G) एक बेस्ट ऑप्शन आहे. हा फोन मीडियाटेक डाइमेंशन 7400-अल्ट्रा (MediaTek Dimensity 7400-Ultra) चिपसेटवर चालतो. यामध्येही तुम्हाला प्रो+ मॉडल प्रमाणे 6.83-इंचाचा शानदार डिस्प्ले आणि गोरिल्ला ग्लास विक्टस 2 (Gorilla Glass Victus 2) ची सुरक्षा मिळते. हा फोन मुख्यतः अशा लोकांसाठी आहे, जे परफॉर्मेंस आणि बजेटमध्ये संतुलन ठेवू इच्छितात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 1:34 PM IST










