Bigg Boss च्या घरातील 2 जिगरी दोस्तांची मैत्री तुटली; एकमेकांना केलं अनफॉलो, कोण आहेत ते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss 19 : बिग बॉस मराठी सुरू असताना आता बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सीझनमधील दोन मित्र चर्चेत आले आहेत. त्यांची मैत्री तुटल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
advertisement
प्रणित मोरेचा हा मित्र दुसरा तिसरा कुणी नाही तर अभिषेक बजाज आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री सर्वांनी पाहिली होती. बिग बॉस संपल्यानंतर झालेल्या पार्टीत दोघंही एकत्र दिसले होते. पण बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर प्रणितचा पहिला स्टॅण्डअप शो झाला. ज्याला गौरव खन्ना, निहाल चुडासमा, बसीर अली यांनी हजेरी लावली होती पण अभिषेक मात्र आला नाही.
advertisement
advertisement
शोमध्ये एका एपिसोडमध्ये प्रणितला स्पेशल पॉवर मिळाली होती. घरातील एका सदस्याला एलिमिनेशनपासून वाचवण्याची संधी त्याला देण्यात आली होती. शोमध्ये कोणी सर्वात जास्त योगदान दिलं आहे त्याला वाचव असं सलमान म्हणाला होता. सलमानने त्याला हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला सांगितला. तेव्हा प्रणितने अभिषेकला न वाचवता अशनूरचं नाव घेतलं होतं. त्याचवेळी त्यांच्या मैत्रीत फूट पडली होती. (सर्व फोटो : सोशल मीडिया)








