Surya Rahu Yuti 2026: पुन्हा अभद्र घडणार! 13 फेब्रुवारीला सूर्य-राहुचा ग्रहण योग अनलकी, 3 राशींसोबत दु:खद घटना
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Rahu Yuti 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी अशा विशिष्ट स्थितींत येतात, ज्याचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. या फेब्रुवारी महिन्यात ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव कुंभ राशीत मार्गक्रमण करणार आहे. विशेष म्हणजे, कुंभ राशीत छाया ग्रह राहू आधीपासूनच विराजमान आहे. यामुळे सूर्य आणि राहूची युती होऊन एक अशुभ मानला जाणारा ग्रहण योग जुळून येत आहे.
advertisement
advertisement
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूची युती अडचणी वाढवू शकते. हा योग कर्क राशीच्या आठव्या स्थानात तयार होईल, जे आरोग्य आणि अचानक उद्भवणाऱ्या समस्यांशी संबंधित मानले जाते. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करू शकतात, त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. काही लोकांना जुने आजार त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थितीतही चढ-उतार येण्याची शक्यता आहे.
advertisement
कन्या राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेष सावध राहिले पाहिजे. सूर्य आणि राहूचा संयोग तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानात होत आहे, ज्यामुळे शत्रू पक्ष सक्रिय होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये किंवा वादांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या, कारण घाईघाईने घेतलेला निर्णय तोटा देऊ शकतो.
advertisement
मीन राशीच्या लोकांसाठी हा ग्रहण योग खर्चात वाढ घडवून आणू शकतो. हा संयोग तुमच्या कुंडलीच्या बाराव्या स्थानात तयार होईल, ज्यामुळे नको असलेले खर्च आणि धनहानीचे योग बनतात. विनाकारण होणारे आरोप किंवा गैरसमज तुमच्या प्रतिमेला धक्का पोहचवू शकतात. प्रेमसंबंधांमध्येही चढ-उतार पाहायला मिळतील. या काळात शनीची साडेसाती देखील सुरू आहे, त्यामुळे आरोग्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)






