advertisement

1 फेब्रुवारीपासून FASTag यूझर्सना मोठा दिलासा! अवश्य जाणून घ्या नवा नियम काय

Last Updated:
New FASTag KYV Rule: नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने FASTag जारी करण्याची प्रोसेस आणखी सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अथॉरिटीने फास्टॅगसाठी अनिवार्य केलेलं KYV प्रोसेस बंद केली आहे. या प्रोसेसमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी पाहता हा निर्णय घेतला आला आहे.
1/9
FASTag KYV New Rule: फास्टॅगने टोल भरणं हे सोपं केलं आहे. अनेकदा टोल प्लाझावर गाडी थांबते, FASTag लावलेलं असतं, पैसेही असतात. पण तरीही मशीन बीप करते आणि समोरून आवाज येतो की, KYV अपडेट करा. ड्रायव्हरचं टेन्शन वाढतं, कारण मागे मोठी लाइन लागते. मग विचार येतो की कशालाच हवं हे झंझट. मात्र आता ही समस्याच NHAI ने दूर केली आहे. नवीन FASTag वाल्यांसाठी हा नियम हटवण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो प्रायव्हेट वाहनचालकांचं टेन्शन वाढलेलं होतं. 1 फेब्रुवारी 2026 पासून टोल प्लाझावर सहज गाडी धावू शकेल.

2/9
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन FASTags जारी करण्याची प्रोसेस सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी वाहनांसाठी FASTags जारी केल्यानंतर आवश्यक असलेली अनिवार्य Know Your Vehicle (KYV) प्रक्रिया प्राधिकरण पूर्णपणे काढून टाकेल. याचा थेट फायदा टोल प्लाझावर कमी अडथळे, कागदपत्रे कमी होणे आणि टोल भरणे सोपे होईल. हा नवीन नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल.

3/9
NHAI काय सांगते? : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्या जास्तीत जास्त वक्तव्यांमध्ये म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2026 किंवा त्यानंतर जारी होणाऱ्या सर्व नवीन FASTag मध्ये  KYV ची गरज नसेल. अथॉरिटीने नवीन जारी केलेल्या फास्टॅगच्या कार (कार, जीप, व्हॅन) साठी 'नो योर व्हीकल' (KYV) ची प्रोसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

4/9
पूर्वी FASTag चालू असुनही वाहन मालकांकडून पुन्हा डॉक्यूमेंट्स, फोटो किंवा व्हेरिफिकेशन मागितलं जात होतं. यामुळे लोकांना वारंवार बँक किंवा कस्टमर केयरचे कॉल झेलावे लागत होते. अनेकदा योग्य डॉक्यूमेंट देऊनही फास्टॅग सस्पेंड केलं जात होतं. आता हा प्रॉब्लम दूर होणार आहे.

5/9
नवीन नियमांनुसार, FASTag जारी करण्यापूर्वी सर्व पडताळणी पूर्ण केली जातील. बँका आता VAHAN डेटाबेसद्वारे वाहन नोंदणीची पडताळणी करतील. ही प्रोसेस अनिवार्य असेल. काही प्रकरणांमध्ये, क्रॉस-व्हेरिफिकेशनसाठी RC वापरला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की टॅग जारी करताना सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करण्याची जबाबदारी आता बँकांवर असेल.

6/9
कोणत्या परिस्थितीत होऊ शकते KYV : खरंतर KYV पूर्णपणे संपवली गेलेली नाही. ती आता फक्त विशेष परिस्थितींमध्ये लागू होईल. जसं की, FASTag एखाद्या चुकीच्या वाहनाला लावलेलं दिसतं, टॅग योग्य प्रकारे चिटकवलेला नसेल, किंवा दुरुपयोग करत असल्याची शंका असल्यास किंवा टोल प्लाझावर वाद झाला तर. सामान्य परिस्थितीमध्ये वाहन मालकांना कोणत्याही अतिरिक्त प्रोसेसमधून जावे लागणार नाही.

7/9
विद्यमान FASTag यूझर्सवर याचा परिणाम होणार नाही : आधीच FASTag वापरणाऱ्यांसाठी नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जोपर्यंत कोणतीही समस्या उद्भवत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचा नियमित KYV मागितला जाणार नाही. यामुळे टोल प्लाझावर अनावश्यक व्यत्यय आणि गैरसोय टाळता येईल.

8/9
या बदलामुळे खाजगी कार मालकांचा ड्रायव्हिंग अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल असा NHAIचा विश्वास आहे. पूर्वी, योग्य कागदपत्रे देऊनही केवायव्हीची वारंवार विनंती केली जात होती, ज्यामुळे प्रवाशांना निराशा होत होती. नवीन प्रणालीमुळे कागदपत्रांचे काम कमी होईल, टोलवरील वाद कमी होतील, फास्टॅग जलद जारी होतील आणि सक्रिय होतील आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणे सोपे होईल.

9/9
कमर्शियल वाहनांसाठीचे नियम बदललेले नाहीत : ही सूट फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांना लागू आहे. बस, ट्रक आणि मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांसारख्या कमर्शियल वाहनांसाठी केवायव्ही प्रक्रिया लागू राहील. शिवाय, सर्व वाहनांसाठी फास्टॅगची आवश्यकता कायम राहील. एनएचएआयने म्हटले आहे की डिजिटल प्रणाली आणि वाहन एकत्रीकरण मजबूत केले असले तरी, जुन्या केवायव्ही प्रक्रियेबाबत लोकांना समस्या आणि तक्रारी येत होत्या. वाहन मालकांना त्यांचा फास्टॅग योग्य मोबाइल नंबर आणि बँक खात्याशी जोडलेला आहे याची खात्री करण्याचा आणि ब्लॅकलिस्टिंग किंवा डबल टोलिंगसारख्या समस्या टाळण्यासाठी वेळेवर रिचार्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement