Kitchen Tips : ताज्या दिसणाऱ्या माशांवर असू शकतं जीवघेणं केमिकल! खाण्यापूर्वी 'या' पद्धतीने नक्की स्वच्छ करा!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to identify fish treated with chemical : प्रक्रिया केलेले मासे खाणे जीवघेणे ठरू शकते, असे सांगितले जाते. मासे जास्त काळ ताजे राहावेत आणि फ्रेश दिसावेत यासाठी केमिकलचा वापर केला जात आहे, पण हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
मुंबई : तुम्हाला मासे खायला आवडत असतील, तर सावध व्हा. कारण बऱ्याचदा मासेविक्रेते माशांना एक केमिकल लावतात. तुम्हाला हे माहीत आहे का? हे केमिकल्स तुम्हाला किती नुकसान पोहोचवू शकतात, याची कल्पना आहे का? हे केमिकल्स माशांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि त्यांना जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी वापरले जातात. हे केमिकल असते फॉर्मेलिन..
फॉर्मेलिनने प्रक्रिया केलेले मासे खाणे जीवघेणे ठरू शकते, असे सांगितले जाते. मासे जास्त काळ ताजे राहावेत आणि फ्रेश दिसावेत यासाठी फॉर्मेलिनचा वापर केला जात आहे, पण हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आज आम्ही तुम्हाला फॉर्मेलिनने प्रक्रिया केलेले मासे कसे ओळखायचे आणि ते कसे स्वच्छ करायचे याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
advertisement
फॉर्मेलिन म्हणजे काय?
फॉर्मेलिन हे फॉर्मेल्डिहाइड आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार झालेले एक केमिकल आहे. प्रयोगशाळांमध्ये अनेक जुने जीव आणि अवयव जतन करून ठेवण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर केला जातो. हे पिवळसर रंगाचे द्रव असते. हे अवयव आणि जतन करून ठेवलेले मृत प्राणी दीर्घकाळ मऊ आणि ताजे ठेवते. कोझिकोड येथील कॅन्सर पॅथॉलॉजिस्ट आणि वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. नीना माम्बिली म्हणाल्या, 'मासे आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण या अन्नामध्ये असे केमिकल असू शकते, जे सहज ओळखता येत नाही. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.'
advertisement
आपल्या देशात, मच्छीमार स्थानिक समुद्री माशांसह इतर माशांवर फॉर्मेलिनची फवारणी करतात किंवा त्यांना त्यात भिजवतात. त्यामुळे मासे अधिक काळ ताजे राहतात. पण हे केमिकल माणसांसाठी हानिकारक आहेत.
फॉर्मेलिनमुळे होऊ शकतात हे जीवघेणे आजार..
पेनसिल्व्हेनियाने इशारा दिला आहे की, हे केमिकल्स आपल्या शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. या केमिकल्सच्या अतिवापरामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. फॉर्मेलिन हळूहळू आपल्या शरीरात विष पसरवत आहे. बाजारातून आणलेल्या ताज्या माशांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे मासे शिजवण्यापूर्वी शक्य तितके फॉर्मेलिन काढून टाकणे आवश्यक आहे. काही सोप्या पद्धतींनी माशांमधील फॉर्मेलिन काढता येऊ शकते.
advertisement
असे स्वच्छ करण्याच्या योग्य पद्धती..
व्हिनेगर पाणी : मासे 15 मिनिटांसाठी व्हिनेगरच्या पाण्यात भिजवल्यास त्यामधील 60% फॉर्मेलिन निघून जाते. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे व्हिनेगर घाला. त्यानंतर मासे या पाण्यात बुडवून 15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर मासे पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुवा. माशांमधील हानिकारक फॉर्मेलिन काही सेकंदांत निघून जाईल.
advertisement
मीठाचे पाणी : ही पद्धत मासे शिजवण्याच्या एक तास आधी वापरता येते. एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा मीठ घाला. आता मासे या पाण्यात बुडवून सुमारे एक तास तसेच ठेवा. एक तासानंतर मासे पाण्याने धुऊन काढा. ही पद्धत माशांमधील 90% पर्यंत फॉर्मेलिन काढून टाकते.
तांदूळ धुतलेले पाणी : स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी फॉर्मेलिन काढण्यासाठी खूप प्रभावी ठरते. पहिल्यांदा तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी एका भांड्यात घ्या. आता मासे या पाण्यात नीट धुवा. नंतर मासे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन काढा. यामुळे 70% फॉर्मेलिन निघून जाईल.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : ताज्या दिसणाऱ्या माशांवर असू शकतं जीवघेणं केमिकल! खाण्यापूर्वी 'या' पद्धतीने नक्की स्वच्छ करा!









