advertisement

Ajit Pawar Funeral : दादांची अकाली एक्झिट! शरद पवारांना धीर देण्यासाठी राज ठाकरे बारामतीत, दोन्ही नेत्यांच्या भेटीने वातावरण हेलावलं!

Last Updated:

Raj Thackeray Meet Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दादांची अकाली एक्झिट! शरद पवारांना धीर देण्यासाठी राज ठाकरे बारामतीत, दोन्ही नेत्यांच्या भेटीने वातावरण हेलावलं!
दादांची अकाली एक्झिट! शरद पवारांना धीर देण्यासाठी राज ठाकरे बारामतीत, दोन्ही नेत्यांच्या भेटीने वातावरण हेलावलं!
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून, लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत एकवटला आहे. राज्यासह देशातील बडे नेते बारामतीत दाखल होत असून संपूर्ण वातावरण अत्यंत शोकाकुल झाले आहे.

राज ठाकरे बारामतीत; पवार कुटुंबियांचे केले सांत्वन

काही वेळापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचले. यावेळी एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार हे शरद पवारांचे खंदे समर्थक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ होते, त्यांच्या अशा जाण्याने शरद पवारांवर मोठा आघात झाला आहे.
advertisement
भेटीदरम्यान, एवढ्या मोठ्या दुःखात असतानाही शरद पवारांनी राज ठाकरेंना बसण्याची विनंती केली, तर राज ठाकरेंनीही अत्यंत आदराने शरद पवारांना बसण्यास सांगत धीर दिला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या देहबोलीत दु:खाच्या आघाताचे प्रतिबिंब दिसून आले.












View this post on Instagram























A post shared by News18.com (@cnnnews18)



advertisement

प्रचारासाठी निघाले अन् काळाने घात केला

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बुधवारी बारामतीला येणार होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचा भीषण अपघात झाला आणि मोठ्या स्फोटात अजितदादांसह सहा जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर सर्वसामान्य जनताही सुन्न झाली आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

advertisement
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सर्वपक्षीय नेते, मंत्री आणि कार्यकर्ते लाडक्या 'दादां'ना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचत आहेत. बारामतीमधील बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद असून, प्रत्येक बारामतीकराच्या डोळ्यात आज अश्रू आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Funeral : दादांची अकाली एक्झिट! शरद पवारांना धीर देण्यासाठी राज ठाकरे बारामतीत, दोन्ही नेत्यांच्या भेटीने वातावरण हेलावलं!
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement