Ajit Pawar Plane Crash : अखेर अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, मृत्यूच्या 24 तासांनंतर मोठी बातमी समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash Black Box : अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातात झाला. पण त्यांच्या विमानाचा अपघात का आणि कसा झाला, यामागील नेमकं कारण ब्लॅक बॉक्समुळे उलगडणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
1100°C पर्यंतच्या आगीत सुमारे 60 मिनिटे टिकून राहण्यासाठी हे डिझाइन केलेलंआहे. म्हणजे, विमान जळले तरी त्याचा डेटा सुरक्षित राहतो. जर विमान समुद्रात पडलं तर हा ब्लॅक बॉक्स 20,000 फूट खोलीपर्यंत पाणी आणि दाब सहन करू शकतो. ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याखालील लोकेटर बीकन असतं, जो पाण्यात पडल्यावर सिग्नल पाठवतो. हा सिग्नल सुमारे 30 दिवस टिकतो, जो शोध पथकाला ते शोधण्यास मदत करतो.
advertisement
अजित पवारांच्या विमानातील असाच ब्लॅक बॉक्स सापडला असून तो आता डिकोड करण्यात येणार आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे (FDR) विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती मिळणार आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे (CVR) वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येईल. हा डेटा डिकोड करण्यासाठी किमान 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होईल.







