Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे मासिक राशीफळ; फेब्रुवारीत मोठ्या संकटातून सुटका, पैसा कोणाला?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
February Monthly Horoscope 2026: नवीन वर्षाचा दुसरा महिना फेब्रुवारी सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या स्थितीत बदल होण्याची सुरुवात होईल, त्याचे थेट राशीचक्रावर परिणाम जाणवतील. फेब्रुवारीमधील ग्रहांच्या स्थिती विशेष असेल, बुध 3 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत संक्रमण करेल आणि तिथे राहूशी युती करेल. त्यानंतर, 06 फेब्रुवारी रोजी शुक्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे लक्ष्मी नारायण योगासह त्रिग्रही योग निर्माण होईल. एकंदरीत ग्रहस्थितीनुसार फेब्रुवारी महिना मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींसाठी कसा असेल जाणून घेऊ.
मेष - फेब्रुवारीची सुरुवात मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. पहिल्याच आठवड्यात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण राहील. या काळात तुमच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना अपेक्षित यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ प्रगतीचा आहे; वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि तुमची जमापुंजी वाढेल.
advertisement
मेष - महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कौटुंबिक बाबींमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, ज्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळेल. महिन्याच्या मध्यात मात्र आपल्या वाणीवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमच्या बोलण्याने जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना सुखद आहे, जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा काळ उत्साहाने भरलेला असेल. तुमचे नियोजित प्रकल्प वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात यश मिळण्याचे योग आहेत. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ अतिशय अनुकूल आहे. या काळात तुम्ही नवीन जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. कोणत्याही मोठ्या निर्णयामध्ये कुटुंबातील सदस्यांचा, विशेषतः आईचा पाठिंबा मिळेल.
advertisement
वृषभ राशीच्या राजकारणात असलेल्या व्यक्तींच्या लोकप्रियतेत वाढ होईल आणि त्यांना एखादे मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे; तुम्हाला नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रेमसंबंधांमधील जुने वाद संपुष्टात येतील आणि तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कुटुंबाकडून तुमच्या विवाहास संमती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र असेल, त्यामुळे मोसमी आजारांपासून सावध राहा आणि दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा.
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अनेक लाभ घेऊन येणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच रखडलेले एखादे मोठे काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही कठीण वाटणारी कामेही यशस्वीपणे पूर्ण कराल. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल. दुसऱ्या आठवड्यात घरात धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते.
advertisement
मिथुन - महिन्याच्या मध्यात जीवनात एखादे अचानक संकट येण्याची शक्यता आहे, परंतु वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही त्यावर मात कराल. व्यावसायिकांनी या काळात पैशांचे व्यवहार करताना किंवा गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. उत्तरार्ध आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील. प्रेमसंबंधात मात्र जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या; किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे स्वरूप येऊ शकते.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीची सुरुवात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या, कारण या निर्णयांचा तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम होईल. व्यावसायिकांना अपेक्षित नफा आणि प्रगती पाहायला मिळेल. कला, लेखन आणि पत्रकारिता क्षेत्रातील लोकांसाठी हा महिना यशाचा शिखर गाठणारा ठरेल; तुम्हाला एखादा मोठा सन्मान किंवा पुरस्कार मिळू शकतो. जमीन किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने सुटतील. कोर्टाच्या कामात विजय मिळेल आणि विरोधक स्वतःहून तडजोडीसाठी पुढे येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांचे सहकार्य लाभेल. महिन्याच्या मध्यात परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल, मात्र कामाच्या व्यापा मुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. प्रेमसंबंधात मधुरता येईल आणि जोडीदाराशी चांगले सूत जुळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव आणि थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या.









