जेवायला कधी येताय? पोलिसाच्या पत्नीचा फोन, घरी जाऊन पाहिलं तर..., सोलापुरात खळबळ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur Police: या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्याच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सोलापूर: जनतेच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसाचेच घर सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई इब्राहिम निजाम शेख यांचं ओम शांतीनगर येथील घर भरदुपारी चोरट्यांनी फोडलं. यातून 1 लाख 68 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रजासत्ताक दिन असल्याने इब्राहिम शेख हे सकाळी 10 वाजता ड्युटीसाठी गेले. दुपारी 12 वाजता पत्नीने जेवणासाठी फोन केला असता, त्यांनी 2 वाजता येणार असे सांगितले. पत्नी मुख्य दरवाजाला कुलूप लावून काकाच्या घरी गेली. जेवणाच्या वेळी घरी परतल्यावर इब्राहिम यांना पत्नीने फोन केला. घर गाठल्यावर मुख्य कुलूप गहाळ आणि कडी-कोयंडा तुटलेला आढळला.
advertisement
आत बेडरूम अस्तव्यस्त, लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटलेला आणि ड्रॉवरमधील सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, 5 अंगठ्या, चांदीच्या पायातील पट्ट्या, गळ्यातील साखळी व चांदीचे इतर दागिने असा एकूण 1 लाख 68 हजार रुपये किमतीचे दागिने गायब असल्याचे उघडकीस आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्याच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement
दरम्यान, इब्राहिम निजाम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के हे करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
जेवायला कधी येताय? पोलिसाच्या पत्नीचा फोन, घरी जाऊन पाहिलं तर..., सोलापुरात खळबळ









