advertisement

Astrology: गुडन्यूज..! याला नशीब म्हणतात, फेब्रुवारीच्या सुरुवातीला 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Last Updated:
February Astrology: सालातील दुसरा फेब्रुवारी महिना लवकरच सुरू होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी 2026 मध्ये ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे कुंभ राशीत निर्माण होणारा चतुर्ग्रही राजयोग, तो अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातोय.
1/5
चतुर्ग्रही राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, या योगाचा प्रभाव तीन राशींवर सर्वाधिक दिसून येईल. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काही राशींचे नशीब लख्ख उजळू शकते.

2/5
फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रह कुंभ राशीत गोचर करणार आहेत. 3 फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी सूर्य ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. 23 फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत आधीच राहू ग्रह उपस्थित आहे. या चार ग्रहांच्या संयोगातून चतुर्ग्रही राजयोग तयार होईल. वैदिक ज्योतिषात हा योग अत्यंत फलदायी मानला जातो. याचा सर्वाधिक फायदा 3 राशींना होईल.

3/5
मिथुन राशीवर होणारा परिणाम - चतुर्ग्रही राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या जातकांना विशेष लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी वाढतील. व्यवसायात नफा आणि गुंतवणुकीशी संबंधित संधी तुमच्या समोर येतील. योग्य वेळी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

4/5
वृश्चिक राशीवर होणारा परिणाम - चतुर्ग्रही राजयोगाचा शुभ प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांवर पडेल. या काळात तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. याव्यतिरिक्त, अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुम्ही एखाद्या नवीन योजनेवर काम सुरू करू शकता.

5/5
कुंभ राशीवर होणारा परिणाम - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा चतुर्ग्रही राजयोग अत्यंत शुभ ठरेल. तुमच्याच राशीत चार ग्रहांची उपस्थिती जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल आणि आत्मविश्वासात भर पडेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement