advertisement

Ajit Pawar Death : ऐनवेळी बदलला होता अजित पवारांच्या विमानाचा पायलट, बारामती दुर्घटनेच्या 48 तासानंतर धक्कादायक खुलासा!

Last Updated:

Pilot swap before Ajit Pawar flight : अजित पवार यांचं विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती.

New Twist in Ajit Pawar Death Case Pilot swap on flight
New Twist in Ajit Pawar Death Case Pilot swap on flight
Ajit Pawar plane crash pilot Change : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी अपघाती निधन झालं. मुंबईवरून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा बारामती एअरपोर्टवर लँडिंग करताना अपघात झाला. धुक्यामध्ये काहीही न दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अशातच आता अजित पवार यांच्या विमानाचे मयत कॅप्टन कपूर यांच्या मित्राने धक्कादायक माहिती दिली आहे. मित्राने केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दुसऱ्या एका वैमानिकाची निवड

मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांचं विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. मात्र, तो वैमानिक विमानतळावर मुंबईत वाहतूक कोंडीत अडकल्यानं त्याला उशीर होत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांना उशीर होत असल्याने कंपनीने कॅप्टन कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. कॅप्टन सुमित कपूर हे साधेसुधे कॅप्टन नव्हते. त्यांना 15000 हून अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव होता.
advertisement

अपघाताच्या काही तास आधी....

कॅप्टन कपूरचे मित्र म्हणाला की, सुमीत एक अत्यंत अनुभवी पायलट होता आणि अशी चूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॅप्टन सुमित कपूर काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून परतला होता. अपघाताच्या काही तास आधी त्याला विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती कॅप्टन सुमितचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी दिली आहे.
advertisement

पाचही जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव यांचा समावेश आहे. कपूर यांचा अपघात झाला ही बातमी ऐकल्यावर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही. ते अत्यंत अनुभवी आणि शिस्तप्रिय वैमानिक होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडू शकते, हे पचवणे कठीण असल्याचं कॅप्टन कपूरच्या मित्राने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : ऐनवेळी बदलला होता अजित पवारांच्या विमानाचा पायलट, बारामती दुर्घटनेच्या 48 तासानंतर धक्कादायक खुलासा!
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement