advertisement

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' महत्त्वाच्या भागांमधील पाणीपुरवठा 10 दिवस विस्कळीत

Last Updated:

Pune Water Cut: महानगरपालिकेने ही गळती मोठी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

News18
News18
पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी, विमाननगर आणि कळस परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पवना बंधाऱ्यातून पाणी वाहून नेणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने, पुढील ८ ते १० दिवस या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेमकं कारण काय?
पुणे महानगरपालिकेच्या चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी रावेत येथील नाल्यामध्ये फुटली आहे. या जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणे कठीण झाले आहे.
advertisement
कोणत्या भागांवर होणार परिणाम?
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या खालील परिसरांमध्ये पाणी कमी दाबाने आणि अनियमित येईल:
विश्रांतवाडी परिसर (अंशतः)
विमाननगर आणि विमानतळ सभोवतालचा परिसर
कळस माळवाडी, जाधववस्ती, म्हस्के वस्ती
संजय पार्क, वर्माशेल आणि गणेशनगर (बोपखेल)
advertisement
पर्यायी व्यवस्था पण मर्यादा!
या भागांना सध्या पर्यायी जलवाहिनीद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. मात्र, मुख्य वाहिनी बंद असल्याने उपलब्ध पाण्याचा दाब कमी राहणार आहे. त्यामुळे किमान पुढील १० दिवस पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' महत्त्वाच्या भागांमधील पाणीपुरवठा 10 दिवस विस्कळीत
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement