advertisement

Premanand Maharaj: चांगली माणसं जीवनात एकटी का पडतात? प्रेमानंद महाराजांनीही सांगितले याचे कारण

Last Updated:

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात की हा एकटेपणा काही वाईट नाही किंवा त्याला कमीपणा मानण्याची गरज नाही. तो स्वाभिमान, स्वावलंबन आणि आतून भक्कम असण्याची ओळख आहे, असं समजा.. कारण

News18
News18
मुंबई : आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा मनात प्रश्न उभा राहतो की चांगली माणसे बऱ्याचदा एकटी पडतात. मित्र, नाती आणि समाजात आपले स्थान निर्माण करताना असे जाणवते की सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा समजून घेणारी माणसे फारच कमी असतात. प्रेमानंद महाराज सांगतात की हा एकटेपणा काही वाईट नाही किंवा त्याला कमीपणा मानण्याची गरज नाही. तो स्वाभिमान, स्वावलंबन आणि आतून भक्कम असण्याची ओळख आहे, असं समजा.
जे लोक दिखावा, स्वार्थ आणि भावनिक देवघेव टाळतात, ते गर्दीत मिसळत नाहीत. त्यामुळे ते वेगळे पडतात. पण हे वेगळेपण म्हणजे शिक्षा नसून आत्मिक वाढीचा एक टप्पा आहे. स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहणे, समोरच्याच्या भावना समजून घेणे आणि शांततेला स्वीकारणे सोपे नसते. म्हणूनच चांगली माणसे अनेकदा एकटी राहतात. हा एकटेपणा माणसाला घडवतो, भक्कम करतो आणि आयुष्यातील खरे सत्य समजायला मदत करतो.
advertisement
प्रेमानंद महाराज काय म्हणाले -
एकटेपणा म्हणजे कमजोरी नाही, ती एक शक्ती आहे. चांगली माणसे गर्दीत सामील होण्यासाठी नाही, तर योग्य नात्यांसाठी आणि सत्यासाठी जगतात. जगाला अनेकदा सत्याची भीती वाटते, म्हणून सत्य बोलणारी माणसे एकटी पडतात. हा एकटेपणा त्यांचा दंड नसून आयुष्यातील एक महत्त्वाचा अनुभव असतो, जो त्यांना आतून निडर बनवतो.
advertisement
चांगल्या लोकांना गर्दीची मान्यता नको असते, त्यांना खरी नाती हवी असतात. जग सत्याला घाबरते, म्हणून खरी माणसे अनेकदा सोडली जातात. जो इतरांचे दुःख समजतो, त्याला समजून घेणारे कमीच मिळतात. शांततेला कमजोरी समजले जाते, पण तीच खरी ताकद असते. मर्यादा ठेवल्यामुळे नाती कमी होतात, पण स्वाभिमान वाचतो. जो तत्त्वांवर चालतो, तो बहुतेक वेळा एकटाच चालतो. चांगली माणसे माफ करतात, पण स्वतःचा आत्मा विकत नाहीत. ज्यांचा वापर करता येत नाही, त्यांना जग सहसा टाळते. एकटेपणा म्हणजे शिक्षा नाही, ती सत्याची निवड आहे. एकांत माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतो. अपेक्षा कमी ठेवल्यामुळे मन कमी दुखावते. नात्यांमध्ये संख्या नाही, तर दर्जा महत्त्वाचा असतो. जिथे भावनांचा हिशोब सुरू होतो, तिथे चांगली माणसे थांबतात. गरज म्हणून नव्हे, तर सन्मानाने राहायला त्यांना आवडते. स्वतःवर विश्वास बसल्यानंतर उणीव वाटत नाही. एकटेपणा माणसाला घडवतो, तोडत नाही. वारंवार ठेचा लागल्या तरी चांगुलपणा संपत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे नसते.
advertisement
एकटे राहणे स्वीकारल्यावर माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. चांगली माणसे उशिरा पुढे येतात, पण त्यांचा प्रकाश खरा असतो. चांगल्या माणसांचा एकटेपणा म्हणजे हार नाही, ती त्यांची ओळख आहे. हा एकटेपणा माणसाला आतून पूर्ण बनवतो. जो माणूस एकटेपणा स्वीकारतो, तो जगातील गोंगाट, दिखावा आणि भ्रमांपासून दूर राहतो. हा मार्ग स्वाभिमान आणि आत्मविश्वासाकडे घेऊन जातो. एकटेपणा माणसाला स्वतःशी जोडतो, विचार करण्याची आणि स्वतःला समजून घेण्याची संधी देतो. हाच काळ माणसाची विचारसरणी आणि आत्मा अधिक प्रगल्भ करतो.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Premanand Maharaj: चांगली माणसं जीवनात एकटी का पडतात? प्रेमानंद महाराजांनीही सांगितले याचे कारण
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement