Vastu Tips: घराच्या आत कधीही असू नयेत अशा 5 गोष्टी; सुख-शांती नांदूच शकत नाही, मनाची-पैशाची गरीबी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या घरात असणं, अशुभ मानलं जातं. आपल्या कोणत्या चुका नकारात्मक ठरू शकतात, याची माहितीही वास्तुशास्त्र देते. अशाच काही गोष्टींची माहिती..
मुंबई : घरात सुख-शांती-समृद्धी राहण्याची सर्वांची इच्छा असते, पण त्यासाठी विविध गोष्टींची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. वास्तुशास्त्रामध्ये जीवनातील कित्येक अडचणी दूर करण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या घरात असणं, अशुभ मानलं जातं. आपल्या कोणत्या चुका नकारात्मक ठरू शकतात, याची माहितीही वास्तुशास्त्र देते. अशाच काही गोष्टींची माहिती खाली दिली आहे, ज्या घरात ठेवल्याने तुम्हाला दारिद्र्य आणि दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो.
न वापरली जाणारी अंगठी-रत्ने - वापरात नसलेली अंगठी कधीही घरात ठेवू नये. त्याचप्रमाणे जे खडे किंवा रत्ने वापरात नाहीत, ती सुद्धा घरात ठेवणे टाळावे. या गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. विशेषतः दुसऱ्या कोणाची अंगठी किंवा खडा चुकूनही आपल्या घरात ठेवू नये.
घरातील कोळीष्टके - अनेक घरांमध्ये कोळीष्टके लागलेली दिसतात. वास्तूच्या नियमांनुसार हे अत्यंत अशुभ मानले जाते. घरात कोळीष्टके असल्यामुळे दुर्दैव आणि दारिद्र्याचा वास होतो. त्यामुळे घरात कोळीष्टके होऊ देऊ नका आणि ती दिसताच त्वरित स्वच्छ करा.
advertisement
घरात काटेरी झाडे - घरात कधीही काटेरी झाडे लावू नयेत, विशेषतः घराच्या आत. काटेरी वनस्पतींचा मानवी मानसिकतेवर वाईट परिणाम होतो आणि जीवनातील विविध क्षेत्रांत अडचणींना सामोरे जावे लागते. ही झाडे धनहानीलाही कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती - वास्तूच्या नियमांनुसार घरात देव-देवतांच्या तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती ठेवणे टाळावे. अशा मूर्ती शक्य तितक्या लवकर एखाद्या मंदिरात नेऊन ठेवाव्यात किंवा नदी, तलावात विसर्जित कराव्यात. घरात अशा मूर्ती असणे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.
बंद पडलेली घड्याळे - अनेक लोक घड्याळ बंद पडल्यावर किंवा खराब झाल्यावरही ती घरातच ठेवून देतात. वास्तूच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. बंद पडलेली घड्याळे आपल्या आयुष्यातील प्रगती थांबवू शकतात आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे बंद घड्याळात नवीन सेल टाकून ती दुरुस्त करून घ्या किंवा घरातून काढून टाका.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 1:15 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घराच्या आत कधीही असू नयेत अशा 5 गोष्टी; सुख-शांती नांदूच शकत नाही, मनाची-पैशाची गरीबी










