Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 4 दिवस ब्लॉक, कधी आणि कुठे, पाहा सविस्तर
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Samruddhi Mahamarg: या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन MSRDC कडून करण्यात आले आहे.
मुंबई: नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रवाशांना वाहतूक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या वतीने हे काम करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्याने काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या कामासाठी 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 14 टप्प्यांत वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये महामार्गावरील वाहतूक अंशतः बंद राहणार आहे. या कालावधीत ठराविक वेळेत नागपूर आणि मुंबई दिशेने जाणारी वाहतूक रोखण्यात येईल.
advertisement
कधी, कुठं असेल ब्लॉक?
31 जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील साखळी क्रमांक 58.9 ते 59.6 दरम्यान नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहील. तसेच साखळी क्रमांक 65.4 येथे नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
1 फेब्रुवारी रोजी सेलू, वर्धा येथील साखळी क्रमांक 31.5 ते 37.7 दरम्यान नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद राहील. याच दिवशी साखळी क्रमांक 37.7 ते 45.4 दरम्यान मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहणार आहे.
advertisement
2 फेब्रुवारी रोजी हिंगणा, नागपूर परिसरात साखळी क्रमांक 8.6, 9.0 आणि 9.5 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद ठेवण्यात येईल. याच ठिकाणी नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत बंद राहील.
3 फेब्रुवारी रोजी आर्वी, वर्धा येथील साखळी क्रमांक 84.4 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेत बंद राहणार आहे.
advertisement
या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन MSRDC कडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 7:58 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 4 दिवस ब्लॉक, कधी आणि कुठे, पाहा सविस्तर







