Weather Alert: जानेवारीअखेर हवामानात मोठे बदल, कुठं पाऊस, तर कुठं वेगळाच अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: जानेवारीअखेर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 30 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
जानेवारी अखेर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आता हिवाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. काही भागांत किमान तापमानात वाढ तर काही ठिकाणी सौम्य घट नोंदवली जात आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा थेट परिणाम महाराष्ट्रावर कमी असला तरी, राज्याच्या अंतर्गत भागांत सकाळच्या वेळेत धुके जाणवू शकते. 30 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज हवामान स्थिर आणि कोरडे राहणार आहे. आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता 60 ते 70 टक्क्यांच्या आसपास राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. किमान तापमानात अचानक 3 ते 5 अंशांची वाढ नोंदवली जात आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात किमान तापमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. आकाश अंशत: ढगाळ ते निरभ्र राहण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका कमी झाल्याने दिवस उबदार जाणवेल. महाबळेश्वरसारख्या डोंगराळ भागात किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भ विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे ते आंशिक ढगाळ राहणार आहे. मराठवाड्यात कमाल तापमान 29 ते 32 अंश आणि किमान 16 ते 20 अंश सेल्सिअस राहील. काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुके जाणवू शकते, तसेच तुरळक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. विदर्भात कमाल तापमान 30 ते 34 अंश आणि किमान तापमान 17 ते 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, येथे पावसाची शक्यता नाही. दिवस उबदार तर रात्री थंड राहतील.
advertisement









