advertisement

Ajit Pawar : सहा महिन्यापूर्वी दादांनी दिली रुग्णवाहिका, त्यातूनच निघाली अंत्ययात्रा, चालकही ढसाढसा रडला

Last Updated:

ज्या नगरपरिषदेला अजित पवार यांनी सहा महिन्यापूर्वी जनेतच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट दिली होती. त्याच रुग्णवाहिकेतून त्याचं पार्थिव न्यावे लागल्याने चालक देखील प्रचंड भावुक झाला होता.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना यावेळी शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंचा समुदाय लोटला होता.या दरम्यान साश्रू नयनांनी कार्यकर्त्यांनी काळजावर दगड ठेवून अजित पवार यांना निरोप दिला. विशेष म्हणझे इतकं सगळं घडून देखील अजित पवार यांच निधन झालंय यावर विश्वास बसत नाही आहे. तसेच या घटनेत ज्या नगरपरिषदेला अजित पवार यांनी सहा महिन्यापूर्वी जनेतच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट दिली होती. त्याच रुग्णवाहिकेतून त्याचं पार्थिव न्यावे लागल्याने चालक देखील प्रचंड भावुक झाला होता.
अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने सगळेच धक्क्यात असतानाच त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान एक अत्यंत भावूक करणारी घटना समोर आली आहे. त्याचं झालं असं की बुधवारी सकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता.या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांचे पार्थिव ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले होती. ती रुग्णवाहिका स्वत: अजित पवार यांनीच जनतेच्या सेवेसाठीच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेला भेट दिली होती. पण ज्या लोकनेत्याने जनतेच्या सेवेसाठी ही गाडी उपलब्ध करून दिली, त्याच गाडीतून त्यांना शेवटचा निरोप दिला जाईल,असे कुणाला वाटले देखील नव्हते.
advertisement
दरम्यान नुसत रुग्णवाहिकाच नाही तर ही गाडी हाकण्यासाठी चालक देखील अजित पवार यांनीच बसवला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती नगरपरिषदेचे रुग्णवाहिका चालक नाझीम काझी यांच्यासाठी हा प्रवास आयुष्यातील सर्वात जड आणि दुखाचा होता. या घटनेबद्दल सांगताना काझी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेकडे दशकाहून अधिक जुनी रुग्णवाहिका असल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आले होते. त्यावर तातडीने उपाययोजना करत, दादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणतीही दिरंगाई न करता आधुनिक सोयींनी सज्ज अशी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली दिल्याचे काझी यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी नाझीम काझी यांनी नोकरीसाठी मदत मागितली होती, तेव्हा अजित पवारांनीच त्यांना नगरपरिषदेच्या रुग्णवाहिका चालकाची नोकरी लावल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
जेव्हा आजीत दादांनी ही रुग्णवाहिका सोपवली तेव्हा त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, 'तुमचेकाम पूर्ण प्रामाणिकपणे करा'. त्यांचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. मला कल्पनाही नव्हती की त्यांनी मला जीव वाचवण्यासाठी जे वाहन दिले होते त्याच वाहनातून मला त्यांचे पार्थिव न्यावे लागेल. हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आहे, हे सांगताना काझींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : सहा महिन्यापूर्वी दादांनी दिली रुग्णवाहिका, त्यातूनच निघाली अंत्ययात्रा, चालकही ढसाढसा रडला
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement