गेटवर थांबवलं, गॉगल काढायला लावला; CISF जवानाने शाहरुखसोबत केलं असं काही... किंग खानच्या कृतीने जिंकली मनं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shahrukh Khan Video: सध्या शाहरुख आपल्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत असतानाच, मुंबई एअरपोर्टवरचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा केवळ पडद्यावरचा 'किंग' नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तितकाच दिलदार आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. सध्या शाहरुख आपल्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत असतानाच, मुंबई एअरपोर्टवरचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने ज्या पद्धतीने सुरक्षा नियमांचे पालन केले आणि ड्युटीवर असलेल्या जवानाशी संवाद साधला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकताच शाहरुख खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. तो गाडीतून उतरून एअरपोर्टच्या गेटवर पोहोचला असता, तेथे तैनात असलेल्या CISF जवानाने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला चष्मा काढण्याची विनंती केली. चेहरा आयडी कार्डवरील फोटोशी जुळवून पाहण्यासाठी हा नियम अनिवार्य असतो. कोणत्याही प्रकारचं स्टारडम न दाखवता शाहरुखने तातडीने आपला गॉगल काढला, जवानाला चेहरा दाखवला आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर चष्मा पुन्हा लावला.
advertisement
विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना शाहरुखच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू होतं. आत जात असताना त्याने त्या जवानाची पाठ थोपटून त्याच्या कामाचं कौतुकही केलं. सेलिब्रिटी असूनही नियमांचा आदर करण्याची ही पद्धत नेटकऱ्यांना प्रचंड भावली आहे. यावेळी त्याची मॅनेजर पूजा डडलानी आणि बॉडीगार्ड रवी सिंगही त्याच्यासोबत होते.
advertisement
advertisement
'किंग' बद्दल मोठी अपडेट!
शाहरुख खान सध्या सुजय घोष आणि सिद्धार्थ आनंद यांच्या 'किंग' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शाहरुखची लेक सुहाना खान या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. बाप-लेकीची ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, ज्याला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.
advertisement
तगडी स्टारकास्ट आणि अभिषेकचा व्हिलन अवतार
'किंग' चित्रपट केवळ शाहरुखमुळेच नाही, तर त्याच्या तगड्या स्टारकास्टमुळेही चर्चेत आहे. यात अभिषेक बच्चन मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जे चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज असेल. याशिवाय चित्रपटात राघव जुयाल, अभय वर्मा, अरशद वारसी, अनिल कपूर, जयदीप अहलावत आणि विशेष भूमिकेत दीपिका पदुकोण व राणी मुखर्जी यांच्याही नावाची चर्चा आहे. हा बिग बजेट चित्रपट यावर्षी २४ डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात धडकणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 11:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
गेटवर थांबवलं, गॉगल काढायला लावला; CISF जवानाने शाहरुखसोबत केलं असं काही... किंग खानच्या कृतीने जिंकली मनं










