advertisement

Thyroid Causes : गप्प राहणाऱ्या महिलांना थायरॉईडचा धोका असतो जास्त? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य!

Last Updated:

Thyroid Causes In Women : अनेकदा आपण थायरॉईडला केवळ एक ‘हार्मोनल आजार’ समजून गोळ्या घेत राहतो, पण कधी विचार केला आहे का की, तुमची ही गप्प बसण्याची सवयही थायरॉईड वाढण्याचे कारण बनू शकते.

महिलांमधील थायरॉइडची लक्षणे
महिलांमधील थायरॉइडची लक्षणे
मुंबई : तुमच्याबाबतीतही असे घडते का की तुम्हाला खूप काही बोलायचे असते, पण नात्यांची मर्यादा किंवा घरातील शांतता राखण्यासाठी तुम्ही तुमचे म्हणणे मनात दाबून ठेवता? जर हो असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अनेकदा आपण थायरॉईडला केवळ एक ‘हार्मोनल आजार’ समजून गोळ्या घेत राहतो, पण कधी विचार केला आहे का की, तुमची ही गप्प बसण्याची सवयही थायरॉईड वाढण्याचे कारण बनू शकते.
या विषयावर नाशिकच्या डॉ. माही चौहान (Dr. Mahi Chauhan, Homeopathy) यांनी सांगितले की, महिलांमध्ये थायरॉईडची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे केवळ हार्मोन्सच कारणीभूत नाहीत. अनेकदा महिला हळूहळू आपले म्हणणे मांडणेच सोडून देतात. कधी घरासाठी गप्प, तर कधी नात्यांसाठी त्या खूप जास्त अ‍ॅडजस्टमेंट करू लागतात. जेव्हा या भावना दडपल्या जातात, तेव्हा घशाजवळ असलेल्या थायरॉईड ग्रंथीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
advertisement
महिलाच का पडतात सर्वाधिक बळी?
समाजात अनेकदा महिलांकडून ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची अपेक्षा केली जाते. कधी मुलांसाठी, कधी पतीसाठी तर कधी समाजासाठी, महिला त्यांच्या भावना, राग आणि गरजा व्यक्त करणे थांबवतात.
डॉक्टरांच्या मते, जेव्हा हे एक्सप्रेशन्स थांबतात, तेव्हा त्याचा थेट ताण घशाजवळ असलेल्या थायरॉईड ग्रंथीवर पडतो. ही ग्रंथी शरीराचा मेटाबॉलिझम आणि रिदम सांभाळते, पण मन अस्वस्थ असेल तर तिचे कार्यही बिघडते.
advertisement
नर्व्हस सिस्टीम आणि हार्मोन्सचा असतो खेळ
जेव्हा तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकत नाही, तेव्हा तुमची नर्व्हस सिस्टीम सतत तणावात राहते. हा तणाव शरीरात ‘कॉर्टिसोल’सारखे हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे कधी थायरॉईड ग्रंथी खूप मंद होते, तर कधी अतिशय सक्रिय होते.
महिलांमधील थायरॉइडची लक्षणे
अचानक वजन वाढणे : ‘इमोशनल स्ट्रेस’मुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो.
अतिशय थकवा : झोपून उठल्यानंतरही थकवा जाणवतो.
advertisement
मूड स्विंग्स आणि केस गळणे : हे फक्त व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नाही, तर दडपलेल्या भावनांचा परिणाम आहे.
‘रिपोर्ट’ नव्हे, हा शरीराचा ‘सिग्नल’ आहे..
थायरॉईडच्या रिपोर्टमध्ये होणारे चढ-उतार हे प्रत्यक्षात तुमच्या शरीराचे संकेत असतात. तुमचा घसा जणू ओरडून सांगत असतो की, “आता स्वतःचेही ऐकणे गरजेचे आहे.” इतरांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि शरीर ते आजाराच्या रूपात बाहेर काढते.
advertisement
कसा कराल बचाव?
मोकळेपणाने बोला : तुमचे म्हणणे मांडायला सुरुवात करा. भांडण करणे गरजेचे नाही, पण भावना योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिका.
छंदासाठी वेळ काढा : पेंटिंग, डान्सिंग किंवा डायरी लिहिणे. हे सगळे तुमच्या ‘एक्सप्रेशन’चे मार्ग आहेत. ते थांबू देऊ नका.
योग आणि ध्यान : घशासाठी ‘उज्जायी प्राणायाम’ आणि ‘भ्रामरी’ अत्यंत प्रभावी ठरतात.
advertisement
तज्ज्ञांची मदत घ्या : तुम्हाला वाटत असेल की हे एकट्याने पेलणे कठीण आहे, तर काउन्सेलर किंवा डॉक्टरांशी बोलण्यात अजिबात संकोच करू नका.
म्हणून महिलांनो, तुमची गप्प बसण्याची सवय नेहमीच चांगली असेल असे नाही. कधी कधी ती तुम्हाला आतून पोखरत असते. लक्षात ठेवा, औषधांचे महत्त्व वेगळेच आहे, पण स्वतःचा आवाज आणि स्वतःचा आनंद शोधणे हीच तुमची सर्वात मोठी हीलिंग आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Thyroid Causes : गप्प राहणाऱ्या महिलांना थायरॉईडचा धोका असतो जास्त? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य!
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement