फुगवटा फुटला! एका झटक्यात 25000 रुपयांनी घसरले चांदीचे दर, मार्केटमध्ये हाहाकार, सोन्याचं काय झालं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
MCXवर सोन्या चांदीचे दर विक्रमी उच्चांकावरून झपाट्याने घसरले. चांदी २५ हजार, सोनं १० हजार रुपयांनी कमी. गुंतवणूकदारांना मोठा धक्का, ग्राहकांना दिलासा.
advertisement
काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींना आज शुक्रवारी जोराचा ब्रेक लागला आहे. बाजार उघडताच मौल्यवान धातूंचे दर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले असून चांदीने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या भावात तब्बल 24,000 ते 25000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
advertisement
काल गुरुवारी चांदीने इतिहास रचत ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आज सकाळच्या सत्रात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला. चांदीचे फ्युचर्स दर सुमारे ६ टक्क्यांनी म्हणजेच २४,००० रुपयांनी कोसळून ३,७५,९०० रुपये प्रति किलोवर आले आहेत. गुरुवारी चांदी ४.०७ लाखांच्या वर होती, तिथून आज मोठी पडझड झाली आहे.
advertisement
चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा भाव ६ टक्क्यांहून अधिक म्हणजे १०,००० रुपयांपेक्षा जास्त घसरला. गुरुवारी सोन्याने १.८० लाखांचा टप्पा पार केला होता, तो आज थेट १,५९,२५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर खाली आला आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
advertisement
डॉलर निर्देशांकात वाढ: अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव निर्माण झाला. १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात होण्याची शक्यता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणबाबतच्या चर्चेच्या संकेतांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटली आहे.








