पती-पत्नीत वाद, मुलगा शाळेत गेला, वडिलांचं धक्कादायक पाऊल, छ. संभाजीनगरात खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सन 2014 मध्ये लग्न झाले असून पतीशी झालेल्या वादानंतर ते वेगळे राहात होते. सध्या न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: आई-वडिलांमधील सुरू असलेल्या वादात एका निष्पाप अल्पवयीन मुलाला त्रास सहन करावा लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आईच्या कायदेशीर ताब्यात असलेल्या 11 वर्षांच्या मुलाला वडिलांनी मित्रांच्या मदतीने शाळेच्या परिसरातून पळवून नेले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला भावसिंगपुरा भागात आपल्या मुलासोबत वास्तव्यास आहे. तिचे 2014 मध्ये लग्न झाले असून पतीशी झालेल्या वादानंतर सध्या न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी पतीने एक मुलगा स्वतःकडे ठेवला होता, तर मोठा मुलगा आईकडेच राहत होता. मात्र, याच मोठ्या मुलाला आता बळजबरीने पळवून नेण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
advertisement
27 जानेवारी रोजी दुपारी 12:10 वाजताच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा औरंगपुरा भागातील शाळेत गेला होता. मात्र, नेहमीप्रमाणे तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेनंतर बुधवारी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये (एमएच 20 एचएच 2015) क्रमांकाची कार स्पष्टपणे दिसून आली असून, त्यामध्ये पतीचे तीन जवळचे मित्र असल्याचे आढळले.
advertisement
दरम्यान, पतीच्या सांगण्यावरूनच या तिघांनी मुलाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 1:32 PM IST









