Gold Silver Price : युद्धाच्या धामधुमीत सोन्याच्या दरात ३२७५ रुपयांची घसरण, चांदीच्या दरातही पडझड, आजचे दर काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Price: भारतीय बाजारपेठेत मात्र सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव लक्षणीयरीत्या खाली आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाच, भारतीय बाजारपेठेत मात्र सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव लक्षणीयरीत्या खाली आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या किमतीत ३,२७५ रुपयांची घसरण...
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. ६ मार्च २०२६ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६१,६७५ रुपयांच्या आसपास होता. मात्र, या संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किमतीत तब्बल ३,२७५ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. युद्धाच्या सावटाखालीही सोन्याचे भाव कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आश्चर्याचे वातावरण आहे.
advertisement
चांदी ९,३३० रुपयांनी स्वस्त
चांदीच्या बाबतीत ही घसरण अधिकच तीव्र आहे. ६ मार्च रोजी २,६८,५७९ रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या दरात या आठवड्यात सुमारे ९,३३० रुपयांची मोठी घट झाली आहे. आजच्या दरानुसार, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीसाठी २,७५० रुपये, तर चेन्नईमध्ये २,८०० रुपये मोजावे लागत आहेत.
गुंतवणुकीचा 'सुवर्ण' काळ?
advertisement
जागतिक स्तरावर जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. इराण-इस्रायल युद्धासारख्या अनिश्चित काळात मात्र सोन्याचे दर वाढण्याऐवजी घसरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, बाजारपेठेतील या घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सोनं स्वस्त होणार?
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असताना केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 14 मार्च रोजी सोन्याच्या बेस इम्पोर्ट प्राइसमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारने सोन्याच्या बेस इम्पोर्ट प्राइस मध्ये प्रति 10 ग्रॅम 12 डॉलर्सची कपात केली आहे. नव्या दरानुसार आता सोन्याचा बेस इम्पोर्ट प्राइस 1664 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून कमी होऊन 1652 डॉलर प्रति 10 ग्रॅम इतका करण्यात आला आहे.
advertisement
बेस इम्पोर्ट प्राइस किंवा टॅरिफ व्हॅल्यू हा असा एक मानक दर असतो, ज्याच्या आधारे आयात केलेल्या वस्तूंवर कस्टम ड्युटी आणि इतर आयात कर आकारले जातात. हा दर कमी केल्यास आयातदारांवरील कराचा काहीसा भार कमी होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 1:54 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price : युद्धाच्या धामधुमीत सोन्याच्या दरात ३२७५ रुपयांची घसरण, चांदीच्या दरातही पडझड, आजचे दर काय?







