advertisement

Kolhapur News: बहिणीने 'अपशब्द' वापरला, भाऊ जिवानिशी गेला; लिफ्ट मागितली अन् मागून केले सपासप वार!

Last Updated:

शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील संदेश शेळके खून प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी युवराज माळी याच्या आईबद्दल मृत...

Crime News
Crime News
जयसिंगपूर (कोल्हापूर) : शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील संदेश लक्ष्मण शेळके (वय-22) या तरुणाच्या खून प्रकरणात जयसिंगपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. बहिणीने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे
  • युवराज रावसाहेब माळी (वय-30, रा. फिल्टर हाऊसजवळ, चिपरी)
  • सूरज बाबासो ढाले (वय-30, रा. खोची, ता. हातकलंगले)
  • गणेश संभाजी माळी (वय-25, रा. माळभाग, चिपरी)
'लिफ्ट'च्या बहाण्याने खून
बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास संदेशचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. सुरुवातीला खुनाचे कारण अस्पष्ट होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू होते. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संदेशच्या मोपेडवर पावसाळी जर्किन घातलेला एक व्यक्ती बसलेला दिसला. त्याच्या वर्णनावरून पोलिसांनी माहिती मिळवली. पोलिसांना आरोपी कर्नाटकातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली.
advertisement
नेमकं काय घडलं?
संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाटा येथे सोडून गावाकडे परत येत होता. त्याचवेळी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आरोपी युवराज माळी त्याच्या मोपेडवर बसला. ऑईल मिलजवळ आल्यानंतर युवराजने धारदार शस्त्राने संदेशच्या मानेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर, सूरज आणि गणेश यांच्या मदतीने युवराज कर्नाटकात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, मृत संदेशच्या बहिणीने युवराजच्या आईबद्दल अपशब्द वापरले होते, याच रागातून युवराजने खुनासारखे गंभीर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Kolhapur News: बहिणीने 'अपशब्द' वापरला, भाऊ जिवानिशी गेला; लिफ्ट मागितली अन् मागून केले सपासप वार!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement