TRENDING:

Sangli Aatpadi ZP election Result 2026 : आटपाडीत पहिला निकाल! करगणी जिल्हा परिषद गटात अजितदादांचा शिलेदार विजयी

Last Updated:

Sangli Aatpadi ZP election result 2026 : दोन युवा नेत्यांमधील संघर्षामुळे दिघंची गटात विजयाचे गणित लावणे कठीण झाले आहे. या गटामध्ये झालेली चुरस ही संपूर्ण तालुक्याच्या निकालाची दिशा ठरवणारी ठरेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Aatpadi ZP election result 2026 : आटपाडी तालुक्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच प्रामुख्याने काटाजोड लढत पाहायला मिळत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या बालेकिल्ल्यात भाजपचे वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तगडे आव्हान उभे केल्याने महायुतीमधील हा अंतर्गत संघर्ष सध्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
News18
News18
advertisement

आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विनायक मासाळ विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.

दिघंची गटामध्ये देखील असाच चुरशीचा मुकाबला होत असून, तिथे जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील (शिवसेना शिंदे गट) रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे कल्लाप्पा कुटे उभे असून, दोन युवा नेत्यांमधील या संघर्षामुळे दिघंची गटात विजयाचे गणित लावणे कठीण झाले आहे. या गटामध्ये झालेली चुरस ही संपूर्ण तालुक्याच्या निकालाची दिशा ठरवणारी ठरेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई–पुणे प्रवास होणार सुसाट, मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला
सर्व पहा

आज सकाळी 10 वाजल्यापासून आटपाडी येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील 4 गट आणि 8 गणांचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पडळकर आणि देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम राहते की तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट मुसंडी मारतो, याचा फैसला आता काही क्षणांतच होईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Aatpadi ZP election Result 2026 : आटपाडीत पहिला निकाल! करगणी जिल्हा परिषद गटात अजितदादांचा शिलेदार विजयी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल