पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
या दुहेरी खुनामुळे सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिस अधिक तपास करत आहे. या प्रकरणानतंर सांगली पोलिसांवार अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होताना दिसत आहेत. पण नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.
advertisement
शाब्यासोबत 8 ते 10 पोरं... जेवण केलं अन्....
मंगळवारी रात्री उत्तम मोहिते यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 12 वाजता वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी झाली. घराच्या परिसरात मांडव घातला जात होता. त्याचवेळी स्थानिक नेते देखील आले होते. तर दुसरीकडे आरोपी शाब्या शेख हा बर्थडे पार्टीला आला. शाब्यासोबत 8 ते 10 पोरं होती. आरोपीने प्रथम जेवणाचा आस्वाद घेतली. अन् शुभेच्छा देण्यासाठी तो स्टेजवर गेला. स्टेजवर गेल्यानंतर मोहितेला हसत शुभेच्छा दिल्या. नंतर अचानक शेख याने गुप्तीने मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार केले.
शाहरुख शेखच्या पायावर वार अन् मृत्यू
आरोपीच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत मोहिते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. शाहरुख शेखच्या हल्ल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित जमावाने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत शाहरुख शेखच्या पायावर वार लागला. पायातून रक्त येऊ लागलं. शाहरूखच्या त्याच्या पायातून प्रचंड रक्तस्राव झाला, त्यानंतर जमावाने त्याच्यावर बेदम मारहाण केली. यात शेखचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्ववैमनस्यातून हल्ला?
दरम्यान, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
