सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या भावावरही हल्ला
उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गणेश मोरे नावाच्या गुंडावर आरोप केले आहेत. गणेश मोरे याने काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या भावावरही हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप उत्तम मोहिते यांच्या मुलीने केला. उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्यांपैकी शाहरुख उर्फ शब्या शेखचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. पण शाहरूखला चाकू लागल्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाले होते.
advertisement
शाब्यासोबत 8 ते 10 पोरं होती
मंगळवारी रात्री उत्तम मोहिते यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री 12 वाजता वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी झाली. घराच्या परिसरात मांडव घातला जात होता. त्याचवेळी स्थानिक नेते देखील आले होते. तर दुसरीकडे आरोपी शाब्या शेख हा बर्थडे पार्टीला आला. शाब्यासोबत 8 ते 10 पोरं होती. आरोपीने प्रथम जेवणाचा आस्वाद घेतली. अन् शुभेच्छा देण्यासाठी तो स्टेजवर गेला. स्टेजवर गेल्यानंतर मोहितेला हसत शुभेच्छा दिल्या. नंतर अचानक शेख याने गुप्तीने मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार केले.
आठ आरोपी कोण?
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मोहिते यांच्या हत्येतील आरोपी समोर आले असून यामध्ये गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, आणि समीर ढोले यांचा समावेश आहे. उत्तम यांच्यावर आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे आणि काठी घेऊन घरात शिरून पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी करून खुन केला.
