सांगली लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.सांगलीत तिरंगी लढत असून तिन्ही उमेदवार पाटील आहेत. तीन पाटलांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने या जागेची सर्वाधिक चर्चा राज्यात झाली.
advertisement
विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही सभा झाली होती. एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील यांचे पारडे जड असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांनी उघड नाराजीही व्यक्त केली होती. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी शेवटपर्यंत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र मविआकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.