TRENDING:

Sangli News: बापानं रात्रभर उलटं टांगलं, बहिणीला गमावलं; मृत्यूच्या उंबरठ्यावरून अनुजा परतली, पण...

Last Updated:

Sangli News: मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या चिमुकलीला नवजीवन मिळाले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: बापाने स्वत:च्या मुलीला उलटे टांगल्याच्या सांगलीतील बनपुरीच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. चोरीच्या संशयावरून पित्यानंच केलेल्या या निर्दयी कृत्यानं एका चिमुकलीला जीव गमवावा लागला. तर दुसरी मृत्यूच्या दारात होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुजाने दिलेल्या माहितीमुळेच हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता याच 11 वर्षाच्या अनुजाबाबत महत्त्वाचं अपडेट आहे.
Sangli News: बापानं रात्रभर उलटं टांगलं, बहिणीला गमावलं; मृत्यूच्या उंबरठ्यावरून अनुजा परतली, पण...
Sangli News: बापानं रात्रभर उलटं टांगलं, बहिणीला गमावलं; मृत्यूच्या उंबरठ्यावरून अनुजा परतली, पण...
advertisement

अनुजासोबत काय घडलं?

पित्याच्या क्रूर मारहाणीत अनुजाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. जखमी अवस्थेत तिला आटपाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिला रुग्णालयात आणले तेव्हा ती अत्यंत अशक्त आणि बेशुद्ध अवस्थत होती. तिच्या हाता-पायांना बांधल्यामुळे त्वचेवर गंभीर जखमा झाल्या होत्या, अनेक ठिकाणी फोड आले होते, तर शरीरावरील मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती.

advertisement

घरात 4 मुली अन् 1 मुलगा; ‘त्या’ दोघींना बापानं उलटं का टांगलं? सांगलीतील थरकाप उडवणाऱ्या घटनेचं भयाण वास्तव

डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

अनुजाची अवस्था पाहून वैद्यकीय पथक काही क्षण हादरून गेले; परंतु वेळ न दवडता डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. जखमा स्वच्छ करण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तिच्या हात-पायांना बँडेज करून तिला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

advertisement

अनुजाची प्रकृती धोक्याच्या बाहेर

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर अनुजाचा जीव वाचवण्यात यश आले. मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या चिमुकलीला नवजीवन मिळाले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र तिच्या शरीरावरील खोल जखमा भरून येण्यासाठी काही काळ लागणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, आरोपी पिता दादू यलमार याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बनपुरीतील ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली. अशा प्रकारच्या घटनाना आळा घालण्यासाठी समाजाने संवेदनशील राहण्याची गरज आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News: बापानं रात्रभर उलटं टांगलं, बहिणीला गमावलं; मृत्यूच्या उंबरठ्यावरून अनुजा परतली, पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल