advertisement

कॉलेजचा ‘अ‍ॅन्युअल डे’, वादळ आलं अन् मंडप कोसळला, सांगलीचा थरकाप उडवणारा Video Viral

Last Updated:

Sangli News: मंडपातील सगळे विद्यार्थी, शिक्षक यांनी संकटाची चाहूल लागताच मंडपाच्या बाहेर कॉलेजच्या इमारतीमध्ये धाव घेतली.

+
कॉलेजचा

कॉलेजचा ‘अ‍ॅन्युअल डे’ सुरू होता, वादळ आलं अन् मंडप उडाला, थरकाप उडवणारा Video Viral

सांगली: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा, वर्षभराच्या यशाचं कौतुक करणारा, मजा मस्ती आणि उत्साहाने बहरलेला दिवस म्हणजेच ‘अ‍ॅन्युअल डे’ अर्थात वार्षिक स्नेहसंमेलन. प्रत्येक कॉलेज दरवर्षी अशा दिवसाची आतुरतेने वाट पाहत जल्लोषात तयारी करत असते. पण सांगलीतील एका कॉलेजमध्ये नेमकं याच दिवशी असं घडलं की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सांगली जिल्ह्यातील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा येथे ‘अ‍ॅन्युअल डे’ साजरा होत होता. यावेळी जोरदार वाऱ्याने मंडप जमीनदोस्त झाला. हा प्रसंग अंगाचा थरकाप उडवणारा आहे. त्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
कार्यक्रमाचा पहिलाच दिवस...
वार्षिकोत्सव कार्यक्रमाचा पहिला दिवस होता. प्रसिद्ध मराठी स्टँडअप कॉमेडियन सौरभ भोसले यांचा धमाल शो झाला. त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमास सुरुवात होऊन अर्ध्या तासातच सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली आणि मंडप हलू लागले. वाऱ्याची गती लक्षात घेता मंडपातील सगळे विद्यार्थी शिक्षक यांनी मंडपाच्या बाहेर कॉलेजच्या इमारतीमध्ये निवाऱ्याला धाव घेतली.
advertisement
सुदैवाने सगळे सुखरूप 
क्षणातच जोरदार वादळ आले आणि मोकळ्या मैदानावर उभारलेला भव्य मंडप कोसळू लागला. सुदैवाने सगळे पटकन इमारतीमध्ये पोहोचल्याने कोणालाही इजा झाली नाही. सगळे सुखरूप असून व्यवस्थापकांकडून कार्यक्रम त्याच ठिकाणी स्थगित करण्यात आला. उर्वरित कार्यक्रम आणि नियोजनानुसार दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम मोकळ्या मैदानावर संपन्न होणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी मोबाइलमध्ये टिपून व्हायरल केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत चर्चेचे कारण ठरतोय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
कॉलेजचा ‘अ‍ॅन्युअल डे’, वादळ आलं अन् मंडप कोसळला, सांगलीचा थरकाप उडवणारा Video Viral
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement