याबाबत मिळालेली माहिती अशी की, बापूराव चव्हाण यांचं विट्यात सराफ दुकान आहे. याशिवाय गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्रीचा व्यवसाय सुद्धा आहे. २०१८ ते २०१३ या काळात ते घानवड गावचे उपसरपंच होते. गुरुवारी दुपारी तीन वाजते ते गार्डी ते नेवरी रस्त्यानं दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा गावच्या बाहेरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. गळ्यावर चाकूने वार करत हत्या केली.
advertisement
बापूराव चव्हाण यांच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 2:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News : माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या, मृतदेह रस्त्यावर, सांगलीत खळबळ