माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेत, यातूनच महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सांगलीतील महिलांनी भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट सोन्याची राखी बनवली आहे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ती भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द केली आहे. शहरातील महिलांनी वर्गणी काढत तीन ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली आहे. ही सोन्याची राखी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना बांधण्यात येणार आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे मात्र लाडक्या बहिण योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. तर आमचं सरकार आलं तर आम्ही बहिणींच्या खात्यात दीड हजार नाही तर तीन हजार जमा करू हा आमचा शब्द आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.