10 डिसेंबर 2024 ते 16 जानेवारी 2026 या दरम्यान शिक्षकाने पीडित मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत सध्या आठवीत शिक्षण घेत आहे. ती तिच्या घरात एकटी राहत होती. वडील माझ्यापेक्षा मोठ्या भावाचे जास्त लाड करत होते, त्यामुळे मला एकटेपणा वाटे. मी शाळेत एकटी राहत असे त्यामुळे सदर शिक्षकाने आपल्याला याबाबत कारण विचारले. शिक्षकाने आपल्याशी मैत्री वाढवली. आईच्या मोबाईलवर आपल्याशी संपर्क केला. त्यानंतर घरी येऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असे सदर पिडित मुलीने फिर्यादीत म्हणटले आहे.
advertisement
घरात घुसून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार
शाळेत आणि वर्गात एकटी राहत होती. त्याचा गैरफायदा घेत शिक्षक भोसले यांनी तिच्याशी सातवीत असतानापासून मैत्री केली. पुढे तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने शाळा प्रशासनाने प्रत्येक महिन्यात शिक्षक - पालक मेळावा घ्यावा यात पोलिस सहभाग घेऊन मार्गदर्शन करतील असे यावेळी घारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी म्हटले आहे.
पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानात खरेदी करायला गेल्यावर अल्पवयीन मुलानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. किराणा दुकानात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
