संजय राऊत यांनी म्हटले की, सध्या माझी प्रकृती बरी असली तरी उपचार सुरू आहेत. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खत्री आहे डिसेंबर नंतर मी पूर्ण बरं होईल असे राऊत यांनी म्हटले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता. सरकार लढवत नव्हते स्थानिक पातळीवर लढत होते आता 5-6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरत असल्याचे राऊत यांनी म्हटले. या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या असतात, स्थानिक कार्यकर्ते निवडणूक लढवतात. आम्ही देखील तेच केले असून स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवत असल्याचे राऊत यांनी म्हटले.
advertisement
> शिंदे यांचा कोथळा अमित शाह काढणार...
संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार आहेत. डोंबिवलीमधील रविंद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे. हा पक्ष अमित शहाने निर्माण केलेला गट असल्याचे राऊत यांनी सांगितले.
> ठाकरे बंधूंच्या भेटीत काय झालं?
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मनसे यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एक सादरीकरण दाखवले. हे सादरीकरण महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने होते. हे पीपीटी सादरीकरण उत्तम होतं, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये अशी काहींची इच्छा आहे. मात्र, ती पूर्ण होणार नाही असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
> आजारपणाच्या काळातील चौकशीसाठी आभार...
आजारपणाच्या काळात प्रकृती विचारपूस केल्याबद्दल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून चौकशी करून सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिल्याचे राऊत यांनी सांगितले. हे संबंध व्यक्तिगत पातळीवरील आहेत. राजकारणात मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर संबंध चांगले असणे ही राजकीय संस्कृती असल्याचे राऊत यांनी म्हटले.
