सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू आहे. या संदर्भात न्यायालयात गंभीर स्वरूपाची तक्रार केली असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. D फॉर डीले द ट्रायल अँड डी फॉर डिरेल the ट्रायल हे सुरू आहे, असा दावा केला आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, आरोपींकडून वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज केले जात आहेत. या खटल्याची सुनावणी लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने स्पष्ट केले त्यातील काही आरोपींनी त्यांना मकोका खटल्यातून दोष मुक्त करावे असा अर्ज दिला आहे आम्ही न्यायालयाला विनंती केली. या खटल्याचे जे अर्ज त्याची सुनावणी लवकर घ्यावी.
advertisement
देशमुख हत्या प्रकरणातील तीन ते सात क्रमांकाचे जे आरोपी आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. सीआयडीने एकत्रित आरोप पत्र दाखल केले आहे हे चुकीचे आहे. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही. हा अधिकार केवळ न्यायालयाला आहे यावर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूर येथील अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आहेचसत्या अनुषंगाने न्यायालयाने आरोपी क्रमांक तीन ते सात यांच्यावरील दोष मुक्तीचा अर्ज याची सुनावणी 24 तारखेला ठेवली आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलाने न्यायालयात काय युक्तिवाद केला?
आज वाल्मिक कराडच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला. त्याने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिले आहे. त्यावर आरोप निश्चित करणे गरजेचे आहे, आरोपी हे आरोपपत्र दाखल झाल्यापासून चार्जफ्रेम झाला नाही, असे गाऱ्हाणे करत असतात.उच्च न्यायालयाने स्टे दिला नसेल तर आरोपी निश्चिती करावी. आरोपी क्रमांक तीन ते सात त्या संदर्भात 24 तारखेला निर्णय दिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने नोटीस दिलेली नाही. वाल्मिक कराडच्या अर्जावर त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आहे.