TRENDING:

काँग्रेस नेत्याच्या नातवावर बिबट्याचा हल्ला, वडिलांच्या प्रचारावरून घरी येत असतानाच धक्कादायक घटना

Last Updated:

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी, सातारा : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत झाली आहे.
अधिराज पाटील उंडाळकर
अधिराज पाटील उंडाळकर
advertisement

अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारावरून येत असतानाच उंडाळे गावात बिबट्याने अधिराज पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक थोडक्यात बचावले

उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आहेत. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही थोडक्यात बचावले.

advertisement

अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर

उंडाळे गावातील घटनेनंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. बिबट्याच्या सततच्या नागरिकांवरच्या हल्ल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मानव-बिबट संघर्ष संघर्ष कमालीचा वाढलाय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मानव-बिबट संघर्ष वारंवार घडत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. बदललेल्या परिस्थितीत ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव, शहरांच्या वेशीवर पोहचला असून मानव-बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे होणाऱ्या मानव-बिबट संघर्षाला आळा घालण्यासाठी आता बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होत आहे. मात्र, वन्यजीवप्रेमी या नसबंदीच्या विरोधात आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेस नेत्याच्या नातवावर बिबट्याचा हल्ला, वडिलांच्या प्रचारावरून घरी येत असतानाच धक्कादायक घटना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल