TRENDING:

Satara Doctor Death : डॉक्टर महिला 'त्या' रात्री हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर

Last Updated:

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणीचं भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टर यांच्यात वाद झाल्याने महिला डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला. मानसिक तणावात असलेल्या तरूणीने हॉटेलवर जात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती . अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 24 तासांनी बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी PSI गोपाळ बदने हा 24 तासांनतरही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

advertisement

हॉटेलवर जाण्याअगोदर नेमकं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत बनकर यांच्या वडिलांच्या फ्लॅटमध्येच डॉक्टर महिला राहत होती. महिला ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला टाळा लावल्याने अनर्थ घडला. आत्महत्येपूर्वी

आरोपी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर प्रशांत बनकरने तू आमच्या फ्लॅटवर राहायचे नाही आणि यायचे नाही. ऐनवेळी जायचे कुठे म्हणून महिला डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. मानसिक तणावात असणाऱ्या संपदा मुंडे यांनी यासंदर्भात पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉल केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

वाद झाल्यानंतर नेमकं काय झालं? 

गेल्या आठ महिन्यांपासून मुंडे या बनकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. २३ तारखेला पहाटे १.३० वाजता महिला डॉक्टरने फलटण येथील हॉटेल मधूदीप मध्ये "चेक इन" केलं. यावेळी महिला डॉक्टरने हॉटेलची रूम २ दिवसांसाठी बुक केली होती. प्राथमिक तपासात हॉटेल मधुदीप येथे जात असताना महिलेसोबत कोणी नव्हतं. महिला डॉक्टर, पी एस आय बदने आणि बनकर यांच्यात अनेक कॉल झाले. दिवसभरात दार न उघडल्यामुळे संशय आल्यामुळे २३ तारखेला संध्याकाळी ४ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने दार उघडले त्यावेळी मृतदेह आढळला.

advertisement

'माझ्या भावाला अडकवलं जातंय', बनकरच्या भावाचा दावा

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना आरोपी प्रशांत बनकरचा भाऊ म्हणाला, "डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होत्या. त्यांच्यात काय बोलणं व्हायचं, याचा तपास व्हायला पाहिजे. माझ्या भावाला अडकवलं जातंय, असं मला वाटतंय. तो घरी फार नसतो. तो अधून मधून येत असतो. आता दिवाळीला आला होता. त्यांच्यात काय चॅटींग व्हायचं. यातून कोण कुणाला जास्त त्रास देत होतं, याचा तपास व्हावा.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खिचिया पापड मुंबईत खावा तर इथंच, 40 रुपयांत मन होईल तृप्त, VIdeo
सर्व पहा

डॉक्टर महिलेवर चार वेळा अत्याचार केलेल्या PSI बदनेचा आणखी एक कारानामा समोर, फलटणमध्ये चर्चांना उधाण

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor Death : डॉक्टर महिला 'त्या' रात्री हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल