डॉक्टर महिलेवर चार वेळा अत्याचार केलेल्या PSI बदनेचा आणखी एक कारानामा समोर, फलटणमध्ये चर्चांना उधाण

Last Updated:

फलटण महिला आत्महत्या प्रकरणी ज्या पोलीस उपनिरीक्षकावर आरोप केले आहेत त्याची आणखी एक कारनामा समोर आला आहे.

News18
News18
सातारा :  फलटणच्या डॉक्टर महिलेच्या तळहातावर सुसाईड नोट आढळली अन् रक्षकच भक्षक बनल्याची थरारक कहाणी समोर आली.. जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनंच बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. तर सुसाईड नोटमध्ये दुसरं नाव प्रशांत बनकर आहे. तो घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमुळेचं तिनं स्वत: चं आयुष्य संपवलं. दरम्यान ज्या पोलीस उपनिरीक्षकावर आरोप केले आहेत त्याची आणखी एक कारनामा समोर आला आहे.
गोपाळ बदने हा साताराच्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याने एकदा नाही , दोनदा नाही तर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याचसोबत तो एक भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचा आरोप होत असल्यानं त्याची आणखी एक काळी बाजू समोर आल्यानं खळबळ उडाली. बदने आणि इतर पीआयच्या माध्यमातून काम सुरू होतं. एका तरुणाचा खून झाला होता त्यातही बदनेवर आरोप होते.
advertisement

बदने भ्रष्टाचारी अधिकारी असल्याची फलटणमध्ये चर्चा

तरुणाचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यात आला होता. बदनेनं शवविच्छेदन अहवाल महिला डॉक्टरवर दबाव टाकून बदलला का अशी चर्चा आहे. यामध्ये राजकीय दबाव देखील होता. तरुणाचा शवविच्छेदन अहवाल आणि डॉक्टरची सुसाईड यामध्ये काही लिंक आहे का? त्या तरुणाचा दोन वेळा शवविच्छेदन अहवाल बदलण्यात आला. तरुणाचा आधी अपघाती मृत्यू दाखवला त्यानंतर खून झाल्याचं स्पष्ट झाला, त्या तरुणाच्या खुनावेळी बदानेच होता. त्याच्या खुनाचा आणि डॉक्टरच्या आत्महत्येचा काही संबंध काही संबंध आहे का? अशी देखील चर्चा सध्या फलटणमध्ये सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
advertisement

कोण आहे PSI गोपाल बदने?

  • गोपाल बदने फलटणमध्ये पीएसआयपदी कार्यरत होता.
  • मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटवर PSI गोपाल बदनेचं नाव
  • या PSI ने ४ वेळा बलात्कार केल्याचं नमूद

घटना पोलीस दलाला काळीमा फासणारी

जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेला बदने भक्षक बनल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर आत्महत्येमुळे पोलीस दलावर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस उपनिरीक्षकानं तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. त्याविरोधात तिनं आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. चहुबाजूनं कोंडी झाल्यामुळेचं टोकाचं पाऊल उचलावलं लागलं. ही घटना पोलीस दलाला काळीमा फासणारी आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टर महिलेवर चार वेळा अत्याचार केलेल्या PSI बदनेचा आणखी एक कारानामा समोर, फलटणमध्ये चर्चांना उधाण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement