सातारा येथील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येनंतर अनेक मोठ-मोठे खुलासे होत आहेत. प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर भाड्याने राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तर मदने हा फलटण ग्रामीण पोलिस दलात कार्यरत होता. प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे .
advertisement
जानेवारी पासून 157 पेक्षा अधिक कॉल
महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारी पासून 157 पेक्षा अधिक कॉल झाल्याचे समोर आला आहे.आत्महत्यापूर्वी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल झाले आहेत. मूळच्या बीडच्या असलेल्या महिला डॉक्टर या बनकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून 8 महिन्यापासून राहत होत्या. महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सॲप कॉल डिलिट केल्यामुळे डॉक्टर यांच्या मोबाईल मधील मेसेज पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सायबर तज्ञांकडून आहे.
बनकरने केला 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ
महिला डॉक्टरांनी आपल्या डाव्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवल्याच पोलिसांना आढळून आलं. आणि या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं. माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने,ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला. असा मजकूर संपदाच्या तळाहातावर आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं, त्यानंतर शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर महिला डॉक्टराचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
पोलीस दलाला काळीमा फासणारी घटना
जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेला बदने भक्षक बनल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर आत्महत्येमुळे पोलीस दलावर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस उपनिरीक्षकानं तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. त्याविरोधात तिनं आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. चहुबाजूनं कोंडी झाल्यामुळेचं टोकाचं पाऊल उचलावलं लागलं. ही घटना पोलीस दलाला काळीमा फासणारी आहे.
हे ही वाचा :
