Satara Doctor Postmortem Report: फलटण महिला डॉक्टर प्रकरणी मोठी अपडेट, अॅडव्हान्स पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, मृत्यूचं कारण समजलं

Last Updated:

Satara Doctor Postmortem Report: डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अपडेट आली असून पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आला आहे.

News18
News18
सातारा :  फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. एका प्रतिष्ठीत डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण तरी काय अशी चर्चा सुरू असताना हातावरील सुसाईड नोट समोर आली आहे. डॉक्टरने या सुसाईडनोटमध्ये नाव होतं PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरचं...बलात्कारासह वारंवार होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिले. डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अपडेट आली असून पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे.
महिला डॉक्टरांनी आपल्या डाव्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवल्याच पोलिसांना आढळून आलं. आणि या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं. माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने,ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला. असा मजकूर  तळाहातावर आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं, त्यानंतर शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर महिला डॉक्टराचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
advertisement

कुटुंबीय मृतदेह घेऊन बीडच्या दिशेने रवाना

ठाण्यात कार्यकरत आहे. जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेला बदने भक्षक बनल्याचं समोर आलं आहे. पोस्ट मॉर्टमचा अँडव्हान्स रिपोर्ट सातारा पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात मृत्यूपूर्वी पीडित तरुणीवर यांच्यावर कुठलेही व्रण किंवा खुणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर  कुटुंबीय मृतदेह घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले आहे.
advertisement

गोपाळ बदनेला सेवेतून निलंबित

डॉक्टर तरुणी ही गावची रहिवासी असून तिचे वडील हे शेतकरी आहे. महिला कुटुंबातली सर्वात मोठी मुलगी होती.जळगावच्या मेडिकल कॉलेजमधून तीने एमबीबीएस केलं.एमबीबीएसनंतर महाबळेश्वरला 6 महिने सेवा दिली.त्यानंतर गेल्या वर्षभरापासून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत होती.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गोपाळ बदनेला सेवेतून निलंबित केलंय.

आत्महत्येमुळे पोलीस दलावर प्रश्न चिन्ह

advertisement
डॉक्टर आत्महत्येमुळे पोलीस दलावर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस उपनिरीक्षकानं तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. त्याविरोधात तिनं आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. चहुबाजूनं कोंडी झाल्यामुळेचं टोकाचं पाऊल उचलावलं लागलं. ही घटना पोलीस दलाला काळीमा फासणारी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor Postmortem Report: फलटण महिला डॉक्टर प्रकरणी मोठी अपडेट, अॅडव्हान्स पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, मृत्यूचं कारण समजलं
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement