'मी अडाणी, लेकीनं आम्हाला कधीच काही सांगितलं नाही', फलटणच्या मृत महिला डॉक्टरच्या बापाचा काळीज चिरणारा आक्रोश
- Published by:Prachi Amale
- Reported by:JITENDRA JADHAV
Last Updated:
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक नवी माहिती समोर येत आहेत.
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. महिलेवर पोलिसाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.आत्महत्येची माहिती मिळताच वडिलांना धक्का बसला आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक नवी माहिती समोर येत आहेत. दोन वर्षापासून मेडिकल ऑफिस सर म्हणून काम करत होती, मागच्या वर्षभरापासून तिच्यावर राजकीय आणि पोलिसांचा मोठा दबाव होता. राजकीय नेत्यांच्या आणि पोलिसांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करायचा, रुग्णालयात घेऊन न येता त्यांना फिटनेस, अनफिटनेस सर्टिफिकेट देण्याचा दबाव होत होता. तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी जी हातावर नावे लिहिली आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
advertisement
बापाने हंबरडा फोडला
वडील म्हणाले, या घटनेविषयी आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती मिळाली. महिला डॉक्टरने जळगावात शिक्षण केले होते. त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून फलटण उपजिल्हा रुग्णालयात दीड वर्षापासून कार्यरत होती. आम्हाला कधीच तिने काही सांगितले नाही. आम्हाला दोन -तीन दिवसातून तिचा फोन यायचा पण तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. आम्ही अडाणी आम्हाला काहीच माहित नाही. शेवटचा फोन दिवाळीच्या आधी झाला होता. दिवाळीला येण्यासाठी सुट्टी नाही त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर येईल. महिलेला दोन भाऊ होते, ती मोठी होती.
advertisement
चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस निरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
advertisement
हातावर काय लिहिले?
माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने, ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 24, 2025 4:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मी अडाणी, लेकीनं आम्हाला कधीच काही सांगितलं नाही', फलटणच्या मृत महिला डॉक्टरच्या बापाचा काळीज चिरणारा आक्रोश