कराड-चिपळूण महामार्गावरील पाटणचा धांडे पुलाची पुनर्बांधणी आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी दोन महिने बंद राहणार आहे. मंगळवारी ठेकेदार कंपनीकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स व सूचना फलक लावण्यात आले.
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, अवकाळी संकट टळलं, पण हवामान विभागाचा नवा अलर्ट
वाहतूक विस्कळीत होणार
advertisement
दरम्यान, कराड-चिपळूण मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक विस्कळीत होईल. तसेच उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.
पर्यायी मार्ग
-कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहने नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथून कराड ते चिपळूण महार्गावरून चिपळूणकडे जातील.
-चिपळूणकडून कराड, उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहने नेरळे गौंड, गव्हाणवाडी फाटा, नवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जातील.
-कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून पाचवंड फाटा, उंडाळे, कोकरुड, मलकापूर, आंबा घाट, संगमेश्वरवरून चिपळूणकडे जाईल.
-चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक संगमेश्वर, आंबा घाट, मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून पुढे कराड, उंब्रज कडे जाईल.
