..तर पवारांनी उपोषणाला बसावं : सदाभाऊ खोत
मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात रान पेटलेलं असताना सदाभाऊ खोत यांनी थेट पवारांनाच आव्हान दिलं आहे. पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसावं. आरक्षण प्रश्नावर आता पवार मगरीचे अश्रू ढाळतायेत, असा आरोप खोत यांनी केला.. मराठा समाजाच्या प्रस्तापित नेत्यांनीच मराठा समाजाची माती केली. 2004 साली बापट आयोग कोणी स्थापण केला. बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं. तरी हा आयोग का स्विकारला. आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांच आरक्षण घालवलं, असा गंभीर आरोप सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची जात ब्राह्मण आहे. म्हणून त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न विरोधक करतायेत, असासुद्धा आरोप खोत यांनी केला.
advertisement
उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी 6 सप्टेंबर) निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.
वाचा - उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकाराचं विनंती पत्र; मनोज जरांगे-पाटील म्हणाले...
जरांगे पाटील उपोषणावर ठाम
सरकारने काल घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत. सरकरच्या शिष्टमंडळाने यावं चर्चा करावी आम्ही त्यांना पुरावे देण्यासाठी तयार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. तसेच हे आंदोलन असेच सुरू असणार असल्याचं देखील ते म्हणाले.