एका खासगी ट्यूशनमध्ये अशाप्रकारे विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हल्लेखोर विद्यार्थी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
हत्येची ही घटना घडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने हत्येचा थरार कसा घडला? याची सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शी वैभव मटकर यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, ज्यावेळी मी घरातून बाहेर आलो. तेव्हा क्लाससमोर खूप विद्यार्थी आणि लोक जमले होते. मॅडमच्या संपूर्ण शरीराला रक्त लागलं होतं. हल्ला झालेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मानेला आणि पोटावर वार झाले होते."
advertisement
या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मुलाला दुचाकीने आधी खासगी रुग्णालयात नेलं. पण खासगी रुग्णालयाने त्याला घेतलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या दोन मुलांमध्ये आधी भांडणं झाली होती. त्यानंतर याच भांडणातून वार केले. हा हल्ला क्लासमध्ये झाला होता. त्यानंतर मॅडम जखमी विद्यार्थ्याला घेऊन बाहेर आल्या. बाहेर आणल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवलं, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
