पुण्यातील साखर संकुलात रविवारी, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एआय तंत्रज्ञानाबाबत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला दोघेही शेजारी बसले होते. त्याशिवाय, या बैठकीला राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, आदी उपस्थित होते. एआयच्या विषयावरील बैठक संपल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बाहेर पडले. या तिघांची बैठक झाल्याची चर्चा सुरू झाली.
advertisement
जयंत पाटील काय म्हणाले?
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले की, बैठक संपल्यानंतर मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय पवारसाहेब यांची एकत्र बैठक झाली, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र, या बातम्या पूर्णपणे निराधार असून आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.